Sankashti Chaturthi 2023 : होय! नूडल्स उपवासाला चालतात; ही रेसिपी ट्राय करून बघाच...

शिवाय नेहमी नेहमी साबुदाणा किंवा भगर खाऊन कंटाळला असाल, तर थोडासा बदल म्हणून हे पदार्थ तुम्ही बनवू शकता.
Noodles
NoodlesSakal

आज संकष्टी चतुर्थी. आजच्या दिवशी अनेकजण उपवास करतात. गणरायाची आराधना करतात. उपवास म्हटलं की साबुदाणा आलाच. साबुदाण्याची खिचडी, वडा, थालिपीठ असे विविध प्रकार घरोघरी होतातच. पण आज उपवासाचे थोडे वेगळे पदार्थ पाहणार आहोत.

हे पदार्थ करायला सोपे आहेत आणि खायला पौष्टिक आहेत. शिवाय नेहमी नेहमी साबुदाणा किंवा भगर खाऊन कंटाळला असाल, तर थोडासा बदल म्हणून हे पदार्थ तुम्ही बनवू शकता. उपवास असताना अनेकदा इतर काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल. आता जर आम्ही म्हटलं की नूडल्स उपवासाला चालतात तर? आपल्यापैकी अनेकजण आनंदाने उड्याच मारतील. याच उपवासाच्या नूडल्सची रेसिपी आपण पाहणार आहोत.

Noodles
Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला करा 'या' गोष्टी, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही

उपवासाच्या नूडल्स

  1. भगर (वरी), राजगिरा, साबुदाणा, शिंगाडा, कच्चे केळ यापैकी ज्या कशाचे पीठ तुमच्याकडे असेल, ते घ्या.

  2. वाटीभर पीठ, वाटीभर पाणी आणि त्यात मीठ घालून उकड करून घ्या.

  3. त्यानंतर शेवयाच्या सोऱ्याने त्याच्या नूडल्सप्रमाणे जाडसर शेवया तयार करून घ्या.

  4. एका मोठ्या भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात या शेवया ठेवून वाफवून घ्या.

  5. या नूडल्स तुम्ही तळूही शकता.

  6. अथवा या नूडल्सला मिरची, तूप, जिऱ्याची फोडणी देऊन खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com