
Swami Samarth Prakatdin : स्वामी समर्थांच्या पूजेतील श्री दत्तांची मूर्ती कोल्हापूरातील 'या' मंदिरात आहे!
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्त महाराजांचे चौथे अवतार आहेत. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होय.
जो स्वामींची अगदी मनोभावे भक्ती करतात. त्यांचा स्वामींच्या चमत्कारांची प्रचिती येते. आजही जेव्हा एखादा भक्त निराश होऊन स्वामींच्या पायावर नतमस्तक होतो. तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण करण्याची कृपा स्वामी करतात.
स्वामींचा प्रटकदिन हा स्वामीभक्तांसाठी जणू दिवाळी दसराच. स्वामींची सेवा घडावी यासाठी प्रत्येकजण करत असतो. अशीच सेवा करणाऱ्या एका भक्ताच्या स्वप्नात दत्त महाराज गेले आणि त्याला दृष्टांत दिला. नक्की काय म्हणाले दत्त महाराज ते पाहुयात
बऱ्याच कोल्हापूरकरांना माहिती नसेल की, कोल्हापूरातल्या एका मंदिरात श्री स्वामी समर्थांनी पुजलेली दत्त महाराजांची मुर्ती आहे. ही मूर्ती ३५० वर्ष जूनी असून ती कोल्हापूरात कशी आली. कोल्हापूरात त्या मूर्तीसोबत काय घडलं हे पाहुयात.
कोल्हापूरातील गंगावेशेत असलेल्या नामदेव महाराजांच्या मठात हि दत्त मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट असे आहे की, या मूर्तीची पूजा साक्षात स्वामी महाराज करत होते.
स्वत: स्वामींनीच त्यांचे शिष्य चिदंबर दिक्षित यांना ती मूर्ती दिली. पूढे चिंदबर दिक्षित यांनी हि मूर्ती त्याचे शिष्य नागलिंग स्वामी (कर्नाटक) यांना दिली. पूढे नागलिंग स्वामी यांनी मूर्ती नामदेव महाराज चहाण यांना दिली व करवीर क्षेत्री जाण्यास सांगितले व साक्षात दत्त भेटेल म्हणाले.

स्वामींच्या पूजेतील हि मूर्ती चोरीला गेली होती
हि मूर्ती घेऊन श्री नामदेव महाराज करवीर क्षेत्री म्हणजेच कोल्हापूरला आले. तिथ त्यांना गंगावेशेत शेषनारायण मंदिराजवळ दत्त अवतारी श्री कृष्ण सरस्वती महाराजाची गाठ पडली. कृष्ण सरस्वती महाराजां हेही दत्तांचेच अवतार आहेत. साक्षात दत्तच नामदेव महाराजांना भेटले.

नामदेव महाराज
या मूर्तीचे वैशिष्ट म्हणजे दत्ताची मूर्ती किंवा फोटो हे ब्रम्हा विष्णू महेश असे असतात. पण मूर्तीत महेश मध्यभागी आहेत. म्हणजे ब्रम्हा महेश विष्णू अशी एकमेव गुरु शिष्य पंरमपरतील आहे.
हि दत्त मूर्ती दोनदा चोरीला गेली होती. तेव्हा दत्त महाराजांनी श्री नामदेव महाराजाच्या स्वप्नात दृष्टात देऊन अंबाबाई मंदिरा जवळील जुने वणक्रूद्रेचे भांडयाच्या दुकानातून घेऊन जायला सांगितले. तेव्हा दोनशे रू. देऊन हि मूर्ती श्री नामदेव महाराजानी परत घेतली. आज हि मूर्ती कोल्हापूरात शुक्रवार पेठेत पंचगंगा रोड येथे श्री नामदेव महाराज मठात पहायला मिळते.