सीमेलगत भुयार सापडले; घुसखोरीचा कट उधळला 

सीमेलगत भुयार सापडले; घुसखोरीचा कट उधळला 

जम्मू  - काश्मीरमध्ये पाकिस्तानातून भुयारीमार्गे घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न बीएसएफने उधळला.  कथुआ जिल्ह्यात हीरानगर सेक्टरमध्ये दीडशे मीटर लांबीचे भुयार आढळले. 

आंतरराष्ट्रीय सीमेवर कथुआ आणि सांबा जिल्ह्यात भुयार किंवा बोगदा सापडण्याची ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. हीरानगर सेक्टरमधील बोबियान गावात हे बोगदे आढळले, अशी माहिती बीएसएफचे महानिरीक्षक (जम्मू) एन.एस. जामवाल यांनी दिली.  ते म्हणाले, की भुयाराच्या दुसऱ्या टोकाला पाकिस्तानातील शेकरगड आहे. ते दहशतवाद्यांच्या तळासाठी कुप्रसिद्ध आहे. आमच्याकडे तेथील घडामोडींची माहिती असल्याने सावध आहोत. पाकिस्तानी डावपेचाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.  भुयारातील पाकिस्तानच्या खुणा असलेल्या वाळूच्या पिशव्या आढळल्या आहेत.

पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी प्रोत्साहन देतो. मात्र, आम्ही नेहमीच सावध असल्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर असे भुयार शोधले जातात. 
- एन.एस. जामवाल, महानिरीक्षक (जम्मू), बीएसएफ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com