सोपोरमध्ये लष्करे तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोरमधील अमरगढ येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरु करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आलेल्या गोळीबारात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर, चकमकीत एक जवानही जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोरमधील अमरगढ येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरु करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आलेल्या गोळीबारात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तिन्ही दहशतवाद्यांच्या रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काश्मीर खोऱ्यात कोणत्याही प्रकारे हिंसाचार उफाळून येऊ नये, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे. मंगळवारी भारतीय लष्कराने लष्करे तैयबाचा कमांडर अबु दुजाना आणि त्याचा साथीदारांचा खात्मा केला होता. त्यानंतर पुन्हा कारवाई करत लष्करेच्या दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: 3 Lashkar terrorists killed in an encounter in Sopore