शरयू नदीत Kiss करणं पडलं महागात; जमावाकडून बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अयोध्येतील शरयू नदी

शरयू नदीत Kiss करणं पडलं महागात; जमावाकडून बेदम मारहाण

उत्तर प्रदेशातील अयोध्येत शरयू नदीत अंघोळ करत असताना पत्नीचे चुंबन घेतल्याप्रकरणी पतीला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (a man thrashed by the public video goes viral)

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीला किस करत असतो त्यानंतर तेथील एक व्यक्ती त्याला त्याच्या पत्नीपासून दुर खेचतात आणि आजूबाजूचे अनेक लोक त्याला मारहाण करतात. सोबत यावेळी एक व्यक्ती अयोध्येत अशी अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, असे म्हणताना या व्हिडीओत ऐकायला मिळते. (a man allegedly kissing his wife while bathing in the saryu river in ayodhya)

हेही वाचा: ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी? गुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलचे कार्यकर्ते

या व्हिडिओत पत्नी आपल्या पतीला त्या लोकांपासून वाचविण्याचा प्रयत्न करते. मात्र ती अपयशी ठरते. त्यानंतर दोघांनाही तेथील जमलेले लोक पाण्यात टाकतात पोलिसांना या संदर्भात तेथील लोकांनी तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा: प्रियकरासोबत पळाली होती बायको, नवऱ्याने दुसरं लग्न करताच गाठलं घर

अयोध्या पोलिसांनी या संदर्भात ट्वीट करत म्हटले पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन अयोध्या यांना तपास करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, घटनेची नेमकी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु काही लोकांनी असा दावा केला की मंगळवारी रामच्या पौड़ी घाटवर ही घटना घडली. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. शरयू ही गंगेच्या सात उपनद्यांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मासाठी ती पवित्र नदी मानली जाते.

Web Title: A Man Allegedly Kissing His Wife While Bathing In The Saryu River In Ayodhya Was Thrashed By The Public Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top