
विवाह हा प्रत्येकासाठी खुप खास क्षण असतो. प्रत्येकाचा आयुष्याचा हा खुप मोठा टर्निंग पॉईंट असतो. जोडीदारासोबत नवं आयुष्य सुरू करण्याचा हा खास क्षण असतो. भारतीय संस्कृतीत या विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विवाहाशी निगडीत अनेक प्रथा परंपरांना सुद्धा तितकेच महत्त्व आहे.
आज आम्ही तुम्हाला एका अशा लग्नाच्या प्रथेबाबत सांगणार आहोत, जी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या प्रथेनुसार लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आई जोडप्यासोबत झोपते. हो, हे खरंय. (after marriage ceremony newlywed couple are accompanied by the bride mother on the first night)
ही प्रथा भारतातील नाही तर चक्क ऑफ्रीकेतील आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रथा आहे. ऑफ्रीकेतही अनेक जुन्या प्रथा आजही पाळल्या जातात. त्यातलीच ही प्रथा. लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आई जोडप्यांसोबत झोपते. जर वधूला आई नसेल कुटूंबातील वयस्कर महिला या जागी त्यांच्यासोबत झोपते.
तुम्हाला वाटेल, या प्रथेमागील कारण काय? लग्नाच्या पहिल्या रात्री आई वधू वराला आनंदी आयुष्याचा कानमंत्र देते. त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करते.
ऑफ्रीकेतील ही प्रथा विचित्र वाटत असली तरी तेथील लोक तितक्याच तत्परतेने ही प्रथा पाळतात. अनेकदा ही प्रथा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. नेटकऱ्यांनी सुद्धा या प्रथेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.