मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढा; DGCA चे विमान कंपन्यांना निर्देश

देशातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या झापाट्याने वाढत आहे.
Airport
Airportsakal
Updated on

नवी दिल्ली : देशातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या झापाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन केले असून, विमानतळांवर आणि विमानात प्रवासादरम्यान, मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत बुधवारी परिपत्रक काढण्यात आले आहे. (DGCA On Covid Protocol)

Airport
वेळ पडल्यास प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; दिल्ली HC

दिल्ली उच्च न्यायालयाने 3 जून रोजी दिलेल्या आदेशानंतर हे परिपत्रक जारी करण्यात आले असून, गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने विमानतळ आणि विमानात मास्क घालण्याबरोबरच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय कोविड-19 संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर केवळ गुन्हा दाखल केला जाऊ नये, तर त्यांना दंडही ठोठावला जावा. तसेच अशा प्रवाशांची नावे 'नो-फ्लाय' यादीत टाकण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com