esakal | नेताजींचे योगदान नाकारण्याचा प्रयत्न केला गेला : अमित शहा
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah west bengal

काहींनी दोन दोन वेळा जन्मठेपही भोगली. वीर सावरकर यांना एकाच आयुष्यात दोन वेळा जन्मठेप झाली होती असे उद्गार अमित शहा यांनी काढले.

नेताजींचे योगदान नाकारण्याचा प्रयत्न केला गेला : अमित शहा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोलकाता दौऱ्यावर आहेत. यावेळी नॅशनल लायब्ररीमध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील महान व्यक्तींना आदरांजली वाहिली. त्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी देशाचा इतिहास तरुणांनी समजून घ्यायला हवा, देशासाठी बलिदान दिलेल्यांबद्दल आदर असायला हवा असं म्हटलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. 

नेताजींनी देशासाठी केलेलं योगदान विसरलं जावं यासाठी अनेक प्रयत्न केले गेले असंही अमित शहांनी यावेळी म्हटलं. त्यांचे कार्य मागे पडावं यासाठी प्रयत्न झाले तरी आजही त्यांना आधीइतकंच आठवलं जातं. त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल असं अमित शहा म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली असून ही समिती ठरवणार आहे की, नेताजींच्या योगदानासाठी त्यांना कशा पद्धतीने आदरांजली वाहता येईल. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. वेळोवेळी त्यांची आठवण यावी यासाठी प्रयत्न केले जातील असंही अमित शहांनी यावेळी सांगितलं. 

हे वाचा - 'ही काय प्रश्न विचारण्याची नवी फॅशन?' दिशा रवीच्या अटकेवरुन अमित शहा यांची आली प्रतिक्रिया

देशातील तरुणांना आवाहन करताना अमित शहा म्हणाले की, नेताजींच्या जीवनाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ब्रिटिशांची नोकरीही त्यांनी नाकारली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले. देशातील तरुणांनी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन वाचायला हवं. त्यांचे आयुष्य तुम्हाला भरपूर काही शिकवेल. देशाच्या इतिहासाकडे आपण पाहण्याची गरज आहे. देशासाठी बलिदान दिलेल्यांना समजून घ्यावं लागेल.

नेताजींची 125 वी जयंती आणि स्वातंत्र्याची 75 वर्षे एकाच वर्षात येतायत हा योगायोग आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आता पुढच्या 75 वर्षांचा प्लॅन तयार करण्याची वेळ आली आहे. भारताला जगातला सर्वात महान देश बनवायचा आहे. जगात भारत महान होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसू शकत नाही असंही अमित शहा यांनी यावेळी म्हटलं.

हे वाचा - 'भारतमातेच्या महान सुपुत्राला नमन'; PM मोदींनी शिवजयंतीनिमित्त शेअर केला VIDEO

स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिलं. शिक्षण, नोकरी इतकंच काय तर घरदारसुद्धा सोडलं. आपलं आयुष्य देशासाठी वाहिलेल्या लोकांनी अनंत यातना सोसल्या. काहींनी दोन दोन वेळा जन्मठेपही भोगली. वीर सावरकर यांना एकाच आयुष्यात दोन वेळा जन्मठेप झाली होती असे उद्गार अमित शहा यांनी काढले.