
दिल्लीतील एका नामांकित रेस्तराँमध्ये एका महिलेला साडी (Saree) नेसल्यामुळे प्रवेश नकारण्यात आल्यीची घटना नुकतीच घडली होती. अॅक्वीला Aquila या रेस्तराँमध्ये प्रवेश करताना साडी नेसलेल्या एका महिलेला तेथील कर्मचाऱ्यांनी अडवले. ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दरम्यान, या घटनेवर कित्येकांनी नाराजी व्यक्त करून टीका केली होती. अभिनेत्री रिचा चड्ढानेही (Richa Chadha) या घटनेवर संताप व्यक्त होता. हे अॅक्वीला Aquila रेस्तराँ आता बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
अंसल प्लाझा येथील अक्विला रेस्तराँला दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने हॉटेल बंद करण्याची नोटीस बजावली होती, त्यानंतर हे रेस्तराँ बंद करण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेच्या नोटीसमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत काहीच उल्लेख केलेला नाही. त्याऐवजी नोटीसमध्ये नागरी संस्थेने आरोप केला आहे की,रेस्तराँ हेल्थ ट्रेड लायसन्सशिवाय चालत आहे'' त्यानंतर मालकाला नोटीस बजावण्यात आली आणि त्याने कामकाज बंद केले. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की रेस्तराँ 27 सप्टेंबर रोजी बंद झाले.
24 सप्टेंबरच्या बंद नोटीसमध्ये म्हटले आहे की, 21 सप्टेंबर रोजी झालेल्या तपासणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य निरीक्षकाला आढळले की, येथील सुविधा कथितरित्या आरोग्य व्यापार परवान्याशिवाय आणि अस्वच्छतेखाली चालू आहे. तसेच यात अनधितकृपणे अतिक्रमण करण्यात आल्याचेही सांगितले आहे.
सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी 24 सप्टेंबर रोजी पुन्हा जागेची पाहणी केली त्यात असे दिसून आले की, बिझनेस त्याच स्थितीत सुरू आहे. ''ही नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत व्यवसाय बंद करणे अनिवार्य असून पुढील सूचना न देता सीलिंगसह योग्य कारवाई केली जाईल'' असेही उल्लेख रेस्टॉरंट मालकाला जारी केलेल्या दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
एसडीएमसी हाउसच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उघड झाला. यावेळी कॉंग्रेसचेसदस्य अँड्र्यूज गंज, अभिषेक दत्त यांनी एक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात कोणत्याही भारतीय रेस्टॉरंट, बार किंवा हॉटेलमध्ये पारंपारिक भारतीय पोशाख घातलेल्या व्यक्तीला प्रवेश नकारला जातो त्यांच्या विरोधात 5 लाख रुपये दंड आकारला जावा''
“रेस्टॉरंट बेकायदेशीरपणे परवान्याशिवाय चालत होते. मी मुद्दा उपस्थित केल्यानंतर नोटीस बजावण्यात आली. आता, अधिकारी सांगतात की रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. परवानगिशिवाय रेस्टॉरंट कसे चालले हे तपासाची बाब आहे, ” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नक्की काय घडले होते?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या १६ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक महिला रेस्तराँच्या ड्रेसकोडबद्दल विचारताना दिसतेय. "साडी नेसलेल्या ग्राहकांना रेस्तराँमध्ये प्रवेश नाही, असं कुठे नमूद केलं आहे? असं असल्यास मला दाखवा", असं ती महिला कर्मचाऱ्यांना विचारते. त्यावर तो कर्मचारी म्हणतो, "मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कपडे परिधान केलेल्यांनाच प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्युअल कपड्यांच्या प्रकारामध्ये मोडत नाही." अनिता चौधरी यांनी संताप व्यक्त करत रेस्तराँमधील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. "इथे साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही कारण ते स्मार्ट कपड्यांमध्ये येत नाही. स्मार्ट कपड्यांची व्याख्या काय ते मला समजावून सांगा, म्हणजे मी साडी नेसणं बंद करेन", असं त्यांनी लिहिलं.
रिचा चड्ढाने व्यक्त केला संताप
'हे सर्व विनोदी आहे. आपल्याच पारंपरिक कपड्यांची निंदा करणे, स्वत:च्या भाषांकडे तुच्छतेने पाहणे, ही देशावरील परकीयांच्या आक्रमणांमुळे झालेल्या बदलांची लक्षणं आहेत. अशा घटनांमुळे समाजसत्तावादीविरोधी आक्रमक राष्ट्रवादी पंथाची तत्वे जन्माला येतात. साडी हे स्मार्ट आहे, पण तुमची पॉलिसी तितकी स्मार्ट नाही,' असं ट्विट रिचाने केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.