Terrorists Mastermind Junaid
Terrorists Mastermind Junaidesakal

मोठी बातमी! फरार मास्टरमाईंड जुनेद अफगाणिस्तानात; 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर महत्त्वाची माहिती समोर

सीसीबी पोलिसांनी (CCB Police) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Summary

दहशतवादी कारवायाप्रकरणी अटक करण्यात आलेले पाच जण जुनैदच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे.

बंगळूर : बंगळुरात सीसीबी पोलिसांनी (CCB Police) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील फरार असलेला जुनैद हा मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. तो आता अफगाणिस्तानामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

Terrorists Mastermind Junaid
Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

दरम्यान, राजधानी बंगळुरमध्ये बुधवारी अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून (Terrorists) चार ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. बंगळुरच्या हेब्बाळ येथील सुलतानपाळ्य येथील मेंढ्यांचा व्यापारी मोहम्मद जुनैद याचे लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांशी थेट संबंध असल्याची माहिती आहे.

अपमानाच्या द्वेषातून एका व्यक्तीचा खून करून तुरुंगात गेलेला जुनैद हा जिहादी म्हणून तुरुंगातून बाहेर आला. तो हेब्बाळच्या सुलतानपाळ्य येथे राहत होता. २०१७ मध्ये जी. सी. नगरच्या नूर अहमद याच्याशी त्याचे भांडण झाले. अपमानाचा बदला म्हणून जुनेदने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अहमदचे अपहरण करून त्याचा खून केला.

याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे. जुनैदने थेट संशयित दहशतवादी नसीरशी संपर्क साधला आहे. पुन्हा २०२० मध्ये तो रक्तचंदनच्या तस्करीत अडकला. जामिनातून बाहेर आल्यानंतर त्यांने एक संपूर्ण टीम तयार केली होती. नंतर त्यांची टीम थेट दुबईला रवाना झाली.

Terrorists Mastermind Junaid
Koyna Dam Update : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या 'कोयना'च्या पाणी पातळीत वाढ; धरणात 'इतक्या' TMC साठ्याची नोंद

२०२१ मध्ये तो भारतीय सीमा ओलांडून अफगाण सीमेजवळ दहशतवादी कारवाया करत होता. तेथून तो बंगळुरमधील त्याच्या साथीदारांना सूचना देत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. जुनैदबाबत अधिकाऱ्यांनी इंटरपोलला आधीच माहिती दिली आहे.

Terrorists Mastermind Junaid
मोठी बातमी! 50 वर्षांपासून धगधगत असलेला बेळगाव सीमाप्रश्‍न सुटणार? 'ग्रामविकास'नं मागवली सीमेलगतच्या गावांची माहिती

दहशतवादी कारवायाप्रकरणी अटक करण्यात आलेले पाच जण जुनैदच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. बंगळूर सेंट्रल सिटी क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी सय्यद सुहेल खान, मोहम्मद फैजल रब्बानी, मोहम्मद उमर, मुद्दस्सिर पाशा आणि जाहिद तबरेज यांना अटक केली.

केंद्रीय गुन्हे शाखेच्या गुप्तहेरांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याकडून चार ग्रेनेड जप्त केले आहेत. जाहिद तबरेज (वय २५) या अटक करण्यात आलेल्या संशयित अतिरेक्याने हे ग्रेनेड त्याच्या कोडीगेहळ्ळी येथील निवासस्थानी ठेवले होते.

Terrorists Mastermind Junaid
Sangli : इतिहासातील पहिलीच घटना! मिरजेत आंबेडकरांच्या नावाची पाडली कमान; पाटणकरांचा आंदोलनाचा इशारा

ते फरार आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या जुनेद कडून एका व्यक्तीच्या माध्यमातून मिळाले होते, अशी माहिती सह पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शरणप्पा एस. डी. यांनी पत्रकारांना दिली. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या पाच दहशतवादी संशयितांमध्ये जाहिदचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com