बेळगावात फळ विक्रेत्यांची रस्त्यावरच धुमश्‍चक्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

बेळगाव: फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी गणपत गल्लीत भररस्त्यावर आज (शनिवार) दुपारी एकच्या सुमारास धुडगूस घातला. एकाने ग्राहकाला आपल्यापेक्षा कमी कमी दरात फळे विकली, या कारणातून एकमेकांवर तराजू, मोठ्या छत्रीचा लाकडी दांडा, लोखंडी सळई यासह जे हातात मिळेल त्याने हल्ला चढवला. यामध्ये दोन्ही गटातील सहाजण जखमी झाले. सर्व जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणपत गल्लीतील रविवार पेठेकडे जाणाऱ्या वळणावर उजव्या बाजूला एकमेकाला लागून गोलेवाले व पठाण अशा दोघांची दोन फळे विक्रीची दुकाने आहेत. आधी ग्राहक पठाणच्या दुकानात गेल्यानंतर त्याला अंतिम दर सांगितला. परंतु, गोलेवालेने यापेक्षा कमी दर देऊन ते गिऱ्हाईक केले. येथेच थांबून तू आमच्यापेक्षा कमी दराने फळांची विक्री का करतोस? असे म्हणत पठाण कुटुंबियाने गोलेवाले कुटुंबियासोबत भांडण काढले. हे भांडण इतके वाढत गेले की भररस्त्यात दोन्ही कुटुंबाची धुमश्‍चक्री सुरू झाली. पठाण कुटुंबीय व त्यांच्या कामगारांनी गोलेवाले बंधून मारायला सुरवात केली. गोलेवाले कुटुंबातील तिघा सदस्यांवर पठाण कुटुंबाने तराजू, पावसापासून रक्षणासाठी लावलेल्या मोठ्या छत्रीचा लाकडी दांडा, लोखंडी सळई, लाकूड याने हल्ला चढवला. यामध्ये एकाचे डोके फुटले, तर अन्य दोघांच्या डोक्‍याला इजा झाली. भर बाजारपेठेत सुरू असलेली ही मारामारी पाहून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची व बघ्यांची एकच पळापळ सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच खडेबाजार व मार्केटचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर, गुन्हे विभागाचे डीसीपी अमरनाथ रेड्डी यांच्यासह अन्य ठाण्याचे पोलिसही येथे आले होते. जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. एकमेकांवर हल्ला चढविल्याने गोलेवाले कुटुंबातील तिघे, तर पठाण गटातीलही लोक जखमी झाले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

    Web Title: belgaum news Fruit sellers hassle on the road