"वर्गात पगडी नको"; बंगळुरुतील कॉलेजची शीख विद्यार्थ्यीनीला सूचना

हिजाबपासून सुरु झालेला हा वाद आता शीखांच्या पगडीपर्यंत येऊन पोहोचला आहे.
Turban_Woman_Amritdhari Sikh
Turban_Woman_Amritdhari Sikh

बंगळुरु : मुस्लीम विद्यार्थीनींनी वर्गात हिजाब (Hijab Row) परिधान करु नये याबाबत कर्नाटक सरकारनं विशेष कायदा आणला आहे. त्यानुसार, अनेक शाळांनी वर्गात शिक्षण घेत असताना हिजाब बंदी लागू केली आहे. यानंतर आता बंगळुरुमधील एका कॉलेजमध्ये एका शीख विद्यार्थ्याला वर्गात असताना डोक्यावर पगडी (Turban Row) उतरवायला भाग पाडलं. या नव्या प्रकारामुळं धार्मिक कपड्यांवरील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. (Bengaluru college asks Sikh student to remove turban while attending classes)

Turban_Woman_Amritdhari Sikh
सुसाईड नोटमध्ये नाव असल्यानं आरोपी दोषी ठरत नाही : High Court

कर्नाटक हायकोर्टात (Karnataka High Court) हिजाब प्रकरणावर सध्या सुनावणी सुरु आहे. या संदर्भातील अनेक विरोधी याचिकांवर दररोज सुनावणी घेतली जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सुनावण्यांमध्ये हायकोर्टाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं म्हटलं होतं की, विद्यार्थ्यांसाठी शाळा-कॉलेजेमध्ये धार्मिक कपडे परिधान करण्याऐवजी शाळेचा गणवेश बंधनकारक आहे. कोर्टाच्या या अंतरिम आदेशानंतर बंगळुरुमधील माऊंट कॅरमल पीयू कॉलेजनं एका १७ वर्षीय अमृतधारी शीख विद्यार्थीनीला वर्गात बसताना डोक्यावरील पगडी घालून बसण्यास सांगितलं.

Turban_Woman_Amritdhari Sikh
युक्रेन-रशिया युद्धावेळी पाकिस्तानचे PM इम्रान खान मॉस्कोमध्ये; म्हणाले, ''मी खूप...''

याप्रकरणी संबंधीत विद्यार्थीनीचे वडील गुरुचरण सिंग म्हणाले, १६ फेब्रुवारी रोजी हा वाद पहिल्यांदा समोर आला. जेव्हा कॉलेज प्रशासनानं नम्रतेनं त्यांच्या मुलीला विनंती केली की ती वर्गात बसताना तिच्या डोक्यावरील पगडी काढून ठेऊ शकते का? यावर तीनं उत्तर दिलं की, तिनं अमृतधारी शीखांची दिक्षा घेतली आहे. जो आमच्या धार्मिक परंपरांचा अंतर्गत भाग आहे. आम्ही कधीही पगडीशिवाय घराबाहेर पडत नाही. त्यादिवशी मी स्वतः कॉलेज प्रशासनाला ई-मेलद्वारे शीखांमधील पाच ककर्स (संस्कार) समजावून सांगितले. जो आमच्या धार्मिक विश्वासाचा अंतर्गत मुद्दा आहे"

Turban_Woman_Amritdhari Sikh
Ukraine-Russia War Photos| युक्रेनच्या सैनिकांनी खोदले बंकर, घडामोडींना वेग

पण कॉलेज प्रशासनानं त्यांच्या या ई-मेलवर प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांच्या मुलीला नेहमीप्रमाणं वर्गात बसू दिलं गेलं. पण त्यानंतर बुधवारी २३ फेब्रुवारी रोजी हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. शिक्षण मंत्र्यालयातील अधिकाऱ्यांनी या कॉलेजला भेट दिली आणि हायकोर्टाची अंतरिम आदेशाचं पालन करण्याचे आदेश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com