Bhagat Singh Jayanti 2022 : एक स्फोट अन् क्रांतीज्योत जनमनात झाली होती Viral

आज भगतसिंग यांची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही रोमांचक गोष्टी.
Bhagat Singh Jayanti 2022 : एक स्फोट अन् क्रांतीज्योत जनमनात झाली होती Viral

Bhagat Singh Jayanti 2022 : स्वातंत्र्यपूर्वी आजच्या सारखा सोशल मीडिया नव्हता. पण तरीही भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांच्या काही ट्रिक्स त्याकाळातही त्यांना सोशल मीडियासारख्या Viral करण्यास उपयोगी ठरल्या. आज अशीच गोष्ट सांगणार आहोत.

भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र्य देण्यासाठी अनेक क्रांतीकारी शहिद झाले होते. यात भगतसिंग यांचे नाव ठळकपणे पुढे आले आहे. भगतसिंग यांचा जन्म १९०७ मध्ये झाला होता. इंग्रजांविरूध्द लढणाऱ्या भगतसिंगना सेंट्रल असेंबलीमध्ये बॉम्ब टाकला म्हणून पकडले गेले. जेलमध्ये इंग्रजांचे अत्याचार सोसल्यावरही त्यांनी स्वातंत्र्याचा नारा कायम ठेवला.

कोर्ट केसच्या काळात त्यांना संधी मिळाली की, ते स्वातंत्र्याचा मागणी देशभरात पोहचवू शकले. त्यांना इंग्रज सकारने फाशीची शिक्षा सुनावली आणि ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधीच २३ मार्च १९३१ला फाशी दिली. यावेळी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. आज भगतसिंग यांची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही रोमांचक गोष्टी.

Bhagat Singh Jayanti 2022 : एक स्फोट अन् क्रांतीज्योत जनमनात झाली होती Viral
75th Independence Day: देशभक्तीत न्हाऊन निघाले बॉलीवूडकर,दिला एकतेचा संदेश

एक स्फोट अन् क्रांतीज्योत जनमनात Viral

भगतसिंग स्वातंत्र्याची लढाई आधीपासून लढतच होते. पण त्या काळात त्यांचा आवाज देशभरात पोहचवण्यासाठी सोशल मीडिया नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या मागण्या ठेवण्यासाठी आणि देशभरात आपला आवाज पोहचवण्यासाठी एकच धमाका केला. सेंट्रल असेंबलीमध्ये ८ एप्रिलला त्यांनी बॉम्बस्फोट केला.

Bhagat Singh Jayanti 2022 : एक स्फोट अन् क्रांतीज्योत जनमनात झाली होती Viral
Independence Day 1947 भारताआधी 'या' देशात भारताचा स्वातंत्रदिन साजरी करण्यात आला होता

या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. पण या स्फोटाचा आवाज तत्कालीन वर्तमानपत्रांद्वारे देशभरात पोहचला. त्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना बॉम्ब टाकल्याबद्दल अटक झाली आणि दोन वर्ष कारावास सुनावला गेला.

Bhagat Singh Jayanti 2022 : एक स्फोट अन् क्रांतीज्योत जनमनात झाली होती Viral
Independence Day; 75 वर्षानंतर फडकवला 'या' गावात तिरंगा

शिक्षेदरम्यान आंदोलन

भगतसिंग कारावासात होते पण तिथूनही त्यांचे आंदोलन सुरूच होते. ते लेख लिहून आपले विचार व्यक्त करत होते. त्यांना हिंदी, पंजाबी, उर्दू, बांग्ला आणि इंग्रजी भाषा अवगत होत्या. याचाच फायदा घेऊन त्यांनी देशभरात आपला संदेश पोहचवला. त्यामुळे जेंव्हाही कोर्टाच्या सुनावणी असायची तेंव्हा पत्रकार तिथे भगतसिंगांच्या सुटकेची मागणीवर जोर धरायचे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात या बातम्या पहिल्या पानावर वाचून नागरीक स्वातंत्र्यासाठी पेटून उठत होते.

फाशीची शिक्षा

केवळ दोन वर्षांच्या कैदेतच भगतसिंगसोबत राजगुरू आणि सुखदेव यांनाही कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. तिघांना २४ मार्च १९३१ ला फाशी दिली जाणार होती. या बातमीने देशवासी चिडले होते. मातृभूमीच्या या तिन्ही सुपुत्रांच्या सुटकेची नागरीकांनी मागणी केली होती. भारतीयांमध्ये आक्रोश होता. इंग्रजांविरोध भारतीयांच्या नजरेत दिसू लागला होता. त्यामुळे इंग्रजही भगतसिंगांना घाबरू लागले होते.

भारतीयांच्या या आक्रोशाला घाबरून व वातावरण बिघडू नये म्हणून गुपचूपरित्या फाशीची तारीख बदलवून २३ मार्च १९३१ ला फाशी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com