Agnipath : जाळपोळ करणाऱ्यांची लष्करात जाण्याची लायकी नाही; भाजपचे मंत्री बरळले

जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही.
 Agnipath Scheme
Agnipath Scheme sakal

चंदीगड : केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) देशभरातून जोरदार निदर्शनं करण्यात येत असून, अनेक राज्यांमध्ये निदर्शनांना (Protest) हिंसक वळन लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या सर्वामध्ये भाजप नेते आणि हरियाणाचे गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आंदोलन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, परंतु जे लोक त्याच्या नावाखाली तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत त्यांची लष्करात जाण्याची लायकी नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (BJP Leader Anil Vij On Agnipath Protest)

 Agnipath Scheme
संजय राऊत म्हणतात, 'अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ...'

अनिल विज म्हणाले की, शिस्तप्रिय लोकचं सैन्यात (Army) जातात. आपल्या देशात काही खोडकर घटक आहेत, जे नेहमीच देशाची शांतता कशी बिघडवायची याची संधी शोधत असतात. मात्र, अशा प्रकारच्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाही. तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्यांविरोधात पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. निदर्शनं, आंदोलनं काढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, या निदर्शनांच्या नावाखाली तोडफोड करणं आणि जाळपोळ करणं चुकीचं आहे.

 Agnipath Scheme
काय आहे मोदींची 'अग्निपथ' योजना? अभिनेता रवि किशनच्या मुलीला पडली भुरळ

राहुल गांधींवरही हल्लाबोल

दुसरीकडे, अनिल विज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली असून, राहुल गांधींना कोणत्याच घटनेमागील चांगले पैलू दिसत नाही. त्यांना सर्वत्र अंधार दिसतो. संपूर्ण देशाने जीएसटीचे कौतुक केले असून दरवर्षी त्याची वसुली वाढत आहे. काळ्या पैशाचा व्यवहार करणारे वगळता सर्वांनी नोटाबंदीचे कौतुक केले मात्र, राहुल गांधींना केवळ टीका करणे जमते. नुकत्याच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात काँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली यातून काँग्रेसने आणि राहुल गांधींनी काय धडा घेतला असा सवाल विज यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com