बिहारमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था
Thursday, 1 October 2020

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची आज (गुरुवार) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तेजप्रताप नगर येथे ही घटना घडली असून, राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा असे मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचे नाव आहे.

पाटणा (बिहार): बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची आज (गुरुवार) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तेजप्रताप नगर येथे ही घटना घडली असून, राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा असे मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचे नाव आहे.

पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार; दोन जवान हुतात्मा

भाजप जयंत मंडलचे ते उपाध्यक्ष होते. आज सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये राजेश कुमार झा यांचा जागेवरच मृत्यू झाला. बेऊर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तेजप्रताप नगरमधील सीताराम उत्सव हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Video: लहान मुलाने वाचविले आजीचे प्राण

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, राजेश कुमार झा यांच्यावर आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

व्हेंटिलेटरवर 51 दिवस काढणाऱया नेत्याने कोरोनाला हरवले!

दरम्यान, राजेश कुमार झा यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात निवडणूक होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader rajesh kumar jha killed in bihar