माझा प्रियकर आहे लग्न लगेच थांबवा म्हणाली पण...

boyfriend was marrying another girl at uttar pradesh
boyfriend was marrying another girl at uttar pradesh

पिलभीत (उत्तर प्रदेश): प्रियकराचा दुसऱया युवतीशी विवाह ठरलेला. शुभ मंगल सावधान म्हणताच प्रेयसी घटनास्थळी दाखल झाली आणि विवाह थांबवला. परंतु, उपस्थितांनी प्रेयसीला बेदम मारहाण केली. पोलिसांनी उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रपूर येथे प्रियकर व प्रेयसी एकत्र काम करत होते. दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु, प्रियकराने दुसऱया युवतीशी विवाह करण्याचे ठरवले. पण, प्रेयसीला याबाबत काही सांगितले नव्हते. प्रियकर सुट्टीवर असताना विवाह करत असल्याची माहिती प्रेयसीला समजली. ऐन विवाहावेळीच प्रेयसी घटनास्थळी दाखल झाली आणि आमचे प्रेम असल्याचे उपस्थितांना सांगू लागली. मात्र, उपस्थितांनी तिला बेदम मारहाण सुरू केली. मारहाण सुरू असताना ती जमिनीवर बेशुद्ध पडली. यानंतरची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. युवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक अभिषेक दीक्षित म्हणाले, युवतीला झालेल्या मारहाणीची चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासल्यानंतर मारहाण करणाऱयांविरोधात कारवाई केली जाईल. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com