पुष्पा चित्रपटाच्या गाण्यावर वधूच्या वडीलांचा झकास डान्स पाहिला का? पहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance viral video

पुष्पा चित्रपटाच्या गाण्यावर वधूच्या वडीलांचा झकास डान्स पाहिला का? पहा Video

सध्या चर्चेतील गाण्यांवर आणि चित्रपटातील डायलॉगवर रील्स बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर असतोच .अलिकडेच ‘पुष्पा’ चित्रपटाने सोशल मिडियावर धुमाकूळ घातलाय. डायलॉग्स आणि श्रीवल्ली या गाण्यावर अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये केलेला हटके डान्स व्हायरल होत आहे. यातच एका लग्नाच्या व्हिडिओमध्ये वधूचे वडील पुष्पा: द राइज या चित्रपटातील ओ अंतवा ओओ अंतवा मावा’ या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हि़डीओ सध्या सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Bride's Father Killer dance on Pushpa movie song goes viral)

हेही वाचा: प्रेम, लैंगिक संबंध अन् खून; पोलिसांनी केली विक्षिप्त किलरला अटक

या व्हिडिओमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनने गाण्यात ज्या पद्धतीने एंट्री केली होती त्याच पद्धतीने वडिलांनी स्टेजवर एन्ट्री करताना दाखवली आहे. वडिलांचा डान्स पाहून व्हिडीओमधील प्रेक्षकांनी मोठ्याने जल्लोष केलाय. व्हिडिओला 8.27 लाख व्ह्यूज आणि 63,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. वडिलांच्या डान्सचे कौतुक करत अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्यात

Web Title: Brides Father Killer Dance On Pushpa Movie Song Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viralVideodanceinstagram
go to top