'बीएसएनएल'लाही घरघर; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना देणार नारळ

'बीएसएनएल'लाही घरघर; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना देणार नारळ

नवी दिल्ली ः सरकारी मालकीच्या भारत दूरसंचार प्राधिकरणावर म्हणजेच बीएसएनएलवर गंबीर आर्थिक अरिष्ट कोसळल्याची जाहीर कबुली या कंपनीच्या अध्यक्षांनी दिली आहे. वाढता तोटा सहन करण्यासाठी लवकरच बीएसएनएलच्या तब्बल 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीची किंवा स्वेच्छानिवृत्ती देणे भाग आहे असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

खुद्द सरकारची मालकी असलेली ही कंपनी मृत्यूशय्येवर असताना सरकार काही मदतीचा हात देणार काय, यावर कंपनीच्या वरिष्ठांकडे सध्या तरी उत्तर नाही. एका खासगी दूरसंचार कंपनीच्या प्रचंड आक्रमणासमोर अनेक खासगी दूरसंचार कंपन्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली असताना, सरकारचे पाठबळ असलेल्या बीएसएननेही गुढघे टेकल्याचे चित्र दिसत आहे. मंत्री, खासदार, सनदी नोकरशहा आदींना फुकट सेवा देऊन देऊन व तद्दन सरकारी पध्दतीने कारभार हाकणाऱ्या बीएसएनएलची आर्थिक प्रकृती आधीच तोळामासा झाली आहे.

दिलासादायक ! कॅनरा बँक करणार 9 हजार कोटींची भांडवल उभारणी

तोटा कमी करण्यासाठी केवळ हजारो कर्मचारी कपात करून भागणार नसून बीएसएनएलच्या ताब्यातील देशभरातील मालमत्ता विकूनही निधी जमविण्याची वेळ या कंपनीवर आली आहे. कंपनीचे अध्यक्ष प्रवीणकुमार पुरवार यांनी आज तशी कबुलीच दिली आहे. एका इंग्रजी दैनिकशी बोलताना पुरवार यांनी, बीएसएनएलचे उत्पन्न वाढविणे तर दूर; पण मुळात ते मिळविणे याला आपले पहिले प्राधान्य असल्याची कबुली दिली. ते म्हणाले की ऑपरेशनल खर्चाची तोंडमिळवणी करणे हे कंपनीसमोरचे दुसरे प्रचंड मोठे आव्हान आहे.

मंदीचा झटका; आयडीबीआय बँकेने घेतला 'हा' मोठा निर्णय

कंपनीचे संकट इतके गंभीर आहे की आम्ही बीएसएनएलच्या 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज देऊन सक्तीची किंवा स्वेच्छआनिवृत्ती देण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. तो सरकारला सादर करण्यात आला आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यावर त्यावर युध्दपातळीवर काम सुरू होईल. कायम कर्मचारी आगामी काही महिन्यात कमी केले जातील. त्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. इतके कर्मचारी कमी केले तरी 1 लाख कर्मचारी बीएसएनएलमध्ये राहतीलच. 

रात्री दीड वाजता मंत्रालयात सापडली महिला

इतक्‍या हजारोंच्या संख्येने कर्मचारी घरी पाठवले तर रोजचा गाडा कसा हाकणार यार पुरवार यांनी, त्यासाठी बीएसएनएल आऊटसोर्सिंग करून मासिक कंत्राटी पध्दतीवर कर्मचारी नेमण्याचा विचार करत आहे असे सांगितले. बीएसएनएलला अन्य दूरसंचार कंपन्यांप्रमाणेच मोठ्या व्तितीय संकटाचा सामना करावा लागतो आहे. विजेची बिले 2700 कोटींची आहेत ती किमान 15 टक्‍क्‍यांनी एका फटक्‍यात कमी करण्याचे पर्याय कंपनीने शोधले आहेत.

चांदीची चमक वाढली; हा नवीन दर

बीएसएनएलच्या देशभरात मोठमोठ्या जमिनी आहेत. त्या लीजवर किंवा मासिक वा वार्षिक भाडेतत्वावर देऊनही कंपनीच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्याचे उपाय तपासले जातील. यातून किमान 200 व कमाल 1000 रूपयांचे उत्पन्न वाढेल अशी आम्हांस आशा आहे. पुढच्या एका वर्षात यावर काम केले जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com