
Buddha Pournima 2022 : या देशात नरेंद्र मोदी साजरी करणार बुद्ध पौर्णिमा
मुंबई : १६ मे या दिवशी असणाऱ्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील लुम्बिनी येथे भेट देणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी मोदी यांना निमंत्रित केले आहे. २०१४ सालापासून मोदी यांची ही नेपाळला पाचवी भेट असेल.
हेही वाचा: Buddha Purnima 2022 Date : या दिवशी साजरी होणार बुद्ध पौर्णिमा; जाणून घ्या महत्त्व
भेटी दरम्यान मोदी मायादेवी मंदिरात जाऊन प्रार्थना करतील. नेपाळ सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या लुम्बिनी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कार्यक्रमात मोदी नेपाळी जनतेला संबोधित करतील.
हेही वाचा: Buddha Pournima 2022 : बुद्ध पौर्णिमेचे चंद्रग्रहण कुठून दिसेल ? पाहा...
नवी दिल्लीच्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेडरेशनच्या लुम्बिनी मठाच्या परिसरात असणाऱ्या 'बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्रा'च्या कोनशिला अनावरण कार्यक्रमात मोदी सहभागी होतील. त्यानंतर दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय बैठक होईल.
हेही वाचा: एकाच वर्षात दुसऱ्यांदा सूपरमून पाहण्याचा योग; पण, 'या'वेळेत असणार चंद्रग्रहण
भारत सरकारच्या 'शेजारी प्रथम धोरणां'तर्गत नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध मोदी यांच्या लुम्बिनी भेटीमुळे अधिक दृढ होतील. तसेच दोन्ही देशांतील सामायिक सभ्यता वारसा अधोरेखित होतो.
हेही वाचा: घरीच साजरी झाली बुद्ध पौर्णिमा; फिजिकल डिस्टन्सिंग पाळत अभिवादन
१६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमा तसेच या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार मानला जातात. त्यामुळे बौद्ध धर्मियांप्रमाणे हिंदू धर्मीयांसाठीही बुद्ध पौर्णिमेचा दिवस महत्त्वाचा असतो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
Web Title: Buddha Pournima 2022 Pm Narendra Modi Will Visit To Lumbini In Nepal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..