
राजधानी दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या सिव्हिल लाइन्स येथील आलिशान कोठीत रविवारी दरोडा टाकून बिल्डरची (Builder) भोसकून हत्या (murder) करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी खून व दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. राम किशोर अग्रवाल (७७) असे मृत बिल्डरचे नाव आहे. (murder in delhi)
प्राप्त माहितीनुसार, मृत अग्रवालच्या मानेवर व शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा होत्या. घरात अग्रवाल यांची मुले आणि सुना राहतात. रविवारी सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये फोन आला. फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितले की, १ आरकेए मार्ग, सिव्हिल लाइन्स येथे माझ्या वडिलांची हत्या झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता अग्रवाल यांचा मृतदेह पोलिसांना आढळला.
मुलाला वडील बेडवर पडलेले (knife attack) दिसले. त्यांच्या शरीरावर चाकूच्या चार (murder) जखमा होत्या. खोलीतून काही बॉक्सही गायब आढळले. ज्यामध्ये रोख रक्कम ठेवली होती. नेमकी किती रोख रक्कम आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. सुरक्षा रक्षकाने दोन व्यक्तींना घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पाहिले होते. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पथके केले तयार
गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले. पोलिस घराभोवती लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. तसेच मृताचे नातेवाइक आणि जवळच्या नातेवाइकांची चौकशी करीत आहेत. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी जिल्हाभरातून अनेक पथके तयार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वृद्ध गुन्हेगारांच्या निशाण्यावर
शनिवारी सकाळी दक्षिण दिल्लीतील ठाणे डिफेन्स कॉलनीअंतर्गत आनंद लोक भागातील एका कोठीतून चार अज्ञातांनी सुमारे चार कोटींचे दागिने लुटले होते. दरोडा टाकल्यानंतर खोलीत असलेल्या आजी आणि नातवाचे हातपाय बांधून चोरट्यांनी पलायन केले. दिल्लीत दोन दिवसांत घडलेल्या दोन घटना पाहता आता पॉश भागात राहणारे वृद्ध गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येते.