CAA : 'या' राज्यांत 'नागरिकत्व कायद्या'ची अंमलबजावणी होणार नाही!

वृत्तसंस्था
शनिवार, 21 डिसेंबर 2019

इंडिया गेटवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी प्रियंका गांधीनी हजेरी लावली. हा कायदा गरिबांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोची : नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ (Ciizenship Amendment Act) देशभरातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांत आंदोलनांचा वणवा पेटला आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशातील सतरा शहरे, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विविध ठिकाणी आंदोलने झाली. काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. तर काही ठिकाणी फक्त निषेध व्यक्त करण्यात आला आहेे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा देशभरात लागू करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्यानंतर देशातील सर्वच चित्र पालटले. त्यामुळे काँग्रेसशासित राज्यांमध्ये हा कायदा लागू न करण्याचा निर्णय काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. कारण हा कायदाच मुळात घटनाविरोधी आहे, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मांडले.

- धक्कादायक! फेसबूकच्या 26 कोटी यूजर्सचा डेटा झाला लीक

अलप्पुझा काँग्रेस समितीकडून शुक्रवारी (ता.20) नागरिकत्व कायद्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

- Dabangg 3 : चाहत्यांना खूष करण्यात यशस्वी; 'ही' मराठी अभिनेत्री ठरली सरप्राईज पॅकेज!

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या कायद्याला विरोध दर्शवत आंदोलकांसोबत मैदानात उतरल्या आहेत. इंडिया गेटवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी प्रियंका गांधीनी हजेरी लावली. हा कायदा गरिबांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गरीबांनाच याचा सर्वाधिक त्रास होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली.

- भाजपला मोठा झटका; महाराष्ट्रापाठोपाठ 'या' राज्यातही गमावणार सत्ता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA will not be implemented in the states where the Congress party is in power