CAB : ईशान्येत आंदोलकांवर गोळीबार; तीन ठार

वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

  • ठिकठिकाणी जाळपोळ, रास्ता रोको
  • सुरक्षा दलांचा आंदोलकांवर गोळीबार
  • रेल्वे, विमानसेवा ठप्प, व्यापारपेठा बंद

गुवाहाटी : "नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा आज आणखी तीव्र झाला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अनेक ठिकाणांवर उग्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बेभान आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दलांना अनेक ठिकाणांवर गोळीबारही करावा लागला. यामध्ये तीन आंदोलकांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

या आंदोलनाचे नेतृत्व नॉर्थ-ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन करीत असून, अन्य तीस विद्यार्थी संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. आसाममध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक असून, दहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेथील इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली आहे. त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वेसेवा पूर्णपणे थांबविण्यात आली असून, विविध रेल्वेस्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी वेगळ्या गाड्यांची सोय केली जात आहे.

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता 'हे' आहेत नवीन नियम.. 

गुवाहाटीमध्ये आज प्रचंड तणाव होता. लष्कराला ध्वजसंचलन करावे लागले. त्रिपुरामध्ये आसाम रायफलचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुवाहाटीमधील आजच्या आंदोलनाचे नेतृत्व "ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन'ने केले. कृषक मुक्ती संग्राम समितीने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे होमग्राउंड असणाऱ्या दिब्रुगडमध्ये छाबुआ येथे रेल्वे स्थानकांना आगी लावण्यात आल्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शरद पवारांच्या आई शारदाबाईही होत्या लढवय्या; वाचा त्यांचा जीवनप्रवास

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आसाममधील नागरिकांनी चिंता करू नये. त्यांचे अधिकार, ओळख आणि सुंदर अशी संस्कृती कुणीही हिरावून घेणार नाही. याचा उत्तरोत्तर विकास होतच राहील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जेव्हा मुंडेच्या प्रयोगाची दखल खुद्द शरद पवार घेतात....

या मंत्र्यांना मिळणार 'हे' खातं ; अखेर खातेवाटप जाहीर.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAB : 3 killed in police firing, curfew imposed in Golaghat