उत्तरेतील कांगडा व्हॅलीसाठी मध्य रेल्वेची मदत; परळ वर्कशॉपने तयार केले खास नॅरोगेज इंजिन...

narrow gadge
narrow gadge

मुंबई : मध्य रेल्वेच्या परळ लोको कार्यशाळेने लॉकडाऊन काळात उत्तर रेल्वेसाठी पहिले नॅरो गेज इंजिन तयार केले आहे. हे इंजिन उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागातील कांगडा व्हॅली रेल्वे विभागात प्रवासी आणि माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी धावणार आहे. कांगडा व्हॅली हा पंजाबमधील पठाणकोट ते हिमाचल प्रदेशमधील जोगिंदर नगरपर्यंत जाणारा 2 फूट 6 इंच (762 मिमी) गेजचा रेल्वेमार्ग आहे. तर हा मार्ग 164 किमी (101.9 मैल) लांब असून कांगडा व्हॅलीच्या उप हिमालयन प्रदेशातून जाते.   

लॉकडाऊनमुळे मर्यादित स्त्रोत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून इंजिन तयार करण्यात आले. मध्य रेल्वेवरील 12 इंजिनासाठीच्या ऑर्डर पैकी बनविलेले हे तिसरे इंजिन आहे. कार्यशाळेने याआधीच नोव्हेंबर 2019 आणि जानेवारी 2020 मध्ये असे दोन लोको तयार करून पाठविण्यात आले आहेत. तत्पूर्वी लॉकडाऊन दरम्यान सानपाडा आणि माटुंगा वर्कशॉपने पहिला व दुसरा उपनगरी रेक देखभाल दुरूस्तीनंतर नंतर सेवेसाठी पाठविला आहे. परळ वर्कशॉपने प्रथम टॉवर वॅगन नियतकालीक देखभालीनंतर सेवेत आले आहे.

कांगडा व्हॅलीच्या या लोकोमध्ये दोन्ही बाजूंनी चालविण्यासाठी समोरच्या ट्रॅकच्या उत्तम दृश्यमानतेसह ड्युअल कॅब देण्यात आली आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीच्या परिस्थितीत काम करण्यासाठी ही इंजिने कोल्ड स्टार्टने सुसज्ज आहेत. आवश्यकते नुसार इंजिनला थंड करण्यासाठी लोकोमध्ये ऑन डिमांड कूलिंग सिस्टम देखील देण्यात आले आहे. एअर ब्रेक्स ब्रॉडगेज लोको सारखेच आहेत. इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर डिझेल इंजिनच्या कार्यक्षमतेचे मापदंड प्रदर्शित केले जातात. 

ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, विजिलंस कंट्रोल डिव्हाइस आणि रेकॉर्डरसह इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटर यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह लोको उपलब्ध केले आहेत. भविष्यातील एअर ब्रेक ट्रेलिंग लोडची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हेवी ड्युटी कॉम्प्रेसर स्थापित केले आहेत. दोन्ही ड्रायव्हर कॅबमध्ये हँड ब्रेक देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com