‘मला राष्ट्रपती व्हायचंय काय करू?’ मोदींना कोणी विचारला प्रश्न?

‘मला राष्ट्रपती व्हायचंय काय करू?’ मोदींना कोणी विचारला प्रश्न?

बेंगळुरू : चांद्रयान-२ मोहिमेला अपयश आल्यानं संपूर्ण देशाची निराशा झाली आहे. पण, देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांना पाठिंबा मिळत आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या मुख्यालयात गेले होते. पण, दुदैवाने लँडरचा इस्रो मुख्यालयाशी संपर्क तुटला आणि सगळ्यांचीच निराशा झाली. यावेळी इस्रो मुख्यालयात उपस्थित विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

देशभरातून ७० विद्यार्थ्यांची झाली निवड
चांद्रयान-२ मोहिमेचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची संधी देशभरातील ७० विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेतून देशभरातून या ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. त्यात मोदींनी विद्यार्थ्यांना आयुष्यात अपयशानं खचून न जाण्याचा सल्ला दिला तसेच भरपूर अभ्यास करण्यासही सांगितले. भारताचे चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिणधृवावर उतरणे अपेक्षित होते. पण, काही किलोमीटवर चांद्रयानाच्या लँडरचा इस्रो मुख्यालयाशी संपर्क तुटला.

काय झाला संवाद?
या संवादामध्ये एका विद्यार्थ्याचा प्रश्न लक्षवेधी ठरला. त्यात विद्यार्थ्याने ‘मला देशाचा राष्ट्रपती व्हायचे आहे. त्यासाठी मी  काय करू?’ असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारला. त्यावर मोदींनी त्या विद्यार्थ्याला ‘राष्ट्रपती का? पंतप्रधान का नाही?’ या संवादामध्ये विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना गराडा घातला होता. काहींनी त्यांच्याकडून स्वाक्षरी घेतली तर काहींनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. मोदींनीही त्यांना फोटोकाढू दिले. मोदींनी या विद्यार्थ्यांपैकी एका मुलीला ‘तू घरी गेल्यानंतर लोकांना चांद्रयान विषयी काय सांगशील?’ असा प्रश्न विचारला. त्यावर त्या विद्यार्थीनीने ‘चांद्रयानाच्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला असे सांगेन.’, असे उत्तर दिले. या विद्यार्थ्यांमध्ये काही भुतानच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यांच्याशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. तुम्ही इथे भारतात काही मित्र बनवले आहेत का?, असा प्रश्न मोदींनी भुतानच्या विद्यार्थ्यांना विचारला. ‘चांगला अभ्यास करा आणि कष्ट करा. आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात धेय्य मोठी ठेवा आणि आणि छोटी छोटी गोष्टी करून ते साध्य करा. त्यासाठी मेहनत घ्या. तुमच्या हातून काही निसटलं असेल तर ते विसरून जा आणि काही साध्य झालं नाही तर निराश होऊ नका.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com