चिनी लष्कराने पँगाँग सरोवराच्या परिसरातून काढता पाय घेतला

pangong lake
pangong lake

नवी दिल्ली - लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याने दोन किलोमीटरपर्यंतची माघार घेतली असून पँगाँग सरोवराच्या परिसरातून चिनी लष्कराने काढता पाय घेतला असून हॉटस्प्रिंग भागातील माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चीन पूर्णपणे माघार घेत नाही तोपर्यंत टेहळणी प्रक्रिया कायम असेल, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आल्याने चिनी माध्यमे खवळली आहेत. तिबेटच्या डोंगराळ भागात चिनी लष्कर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असल्याची दर्पोक्ती ‘ग्लोबल टाईम्स’ने केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताबा रेषेवर ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये झालेल्या सहमतीनंतर चिनी सैन्याने माघार घेतली आहे. त्याअंतर्गत आज गस्ती चौकी पंधरापर्यंत चिनी सैन्य मागे जाण्याची प्रक्रिया  पूर्ण झाल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. गलवान खोऱ्यातील गस्ती चौकी क्र ः १४,  आणि फिंगर एरियातूनही चीनने माघारीस सुरवात केली आहे.  अर्थात, या प्रक्रियेला आणखी वेळ लागू शकतो, असे लष्कराचे म्हणणे आहे.

रणगाडे तैनात
चीनबाबत कोणतीही जोखीम पत्करण्याची भारताची तयारी नसून सोमवारी लढाऊ विमानांद्वारे सरहद्दीवर टेहळणी करण्यात आली तसेच खबरदारीचा उपाय म्हणून ‘टी-90’ रणगाडे देखील तैनात करण्यात आले आहेत. भारताच्या या सजगतेमुळे चीन अस्वस्थ झाला आहे त्यामुळेच ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी माध्यमामधून भारताला इशारा दिला जात आहे. 

काँग्रेसची टीका
सरहद्दीवरील वस्तुस्थितीवरून काँग्रेसने सरकारला पुन्हा प्रश्न केले आहेत. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून सरकारवर प्रश्नांची फैर झाडली. चिनी सैन्याचे माघारी जाणे आनंददायी आहे. परंतु, त्यांनी कोणत्या ठिकाणाहून माघार घेतली आणि आता ते नेमके कुठे आहेत याची माहिती कळू शकेल काय? यासोबतच भारतीय सैनिकांनी कोणत्या ठिकाणापासून माघार घेतली आहे? या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेची आहेत. कारण 15 जूनला नेमके कोठे  काय झाले ? याच्या शोधात भारतीय आहेत, अशी विचारणा चिदंबरम यांनी केली आहे.

‘ग्लोबल टाईम्स’ची दर्पोक्ती
भारताच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी तिबेटच्या अति उंचावरील भागामध्ये रॉकेट लाँचर, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, विमानविरोधी बंदुका, रणगाडे आणि लढाऊ हेलिकॉप्‍टर या शस्त्रसामग्रीनिशी चिनी लष्कर सज्ज असल्याचा तसेच गलवान खोऱ्यात भारताने तैनात केलेल्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर, टी-90 रणगाड्यांच्या तुलनेत चिनी शस्त्रास्त्रे आधुनिक असल्याचा दावा ग्लोबल टाईम्सच्या लेखात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com