

CJP removes spokesperson Vijeta Dahiya
esakal
Vijeta Dahiya scapegoat statement : विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) मध्ये अंतर्गत वाद उफाळल्याचे समोर आले आहे. कॉकरोच जनता पक्षाने बुधवारी (२२ जुलै) प्रवक्ते विजेता दहिया यांची "अत्यंत असंवेदनशील वर्तन" केल्याचा आरोप करत पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर दहिया यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके आणि इतर नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
दहिया यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, पक्षातून काढून टाकल्यानंतर आपण खूप व्यथित झालो आहोत. २० जुलै रोजी झालेल्या 'चलो संसद' आंदोलनादरम्यान बर्गर खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आपल्यावर टीका केली आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडल्याचा दावा त्यांनी केला.