भाजपला मोठा धक्का; 23 पालिका काँग्रेसच्या 'हाता'त

Congress Ahead Of BJP In Rajasthan Municipal Elections
Congress Ahead Of BJP In Rajasthan Municipal Elections

जयपूर : राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मतदारांनी भाजपला स्पष्ट नाकारल्याचे समोर आले आहे. २ महापालिका, ३० नगरपालिका आणि १७ नगरपरिषदा अशा एकूण ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं २३ ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे.

या निवडणुकीत भाजपला फक्त सहा ठिकाणी विजय मिळवता आला आहे. २० जागांवर अन्य पक्ष आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. ही कामगिरी पक्षनेतृत्वासाठी चिंता वाढवणारी असून भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सावरकरांच्या भारतरत्नवरून केंद्र सरकारचा खुलासा

डिसेंबर २०१८ मध्ये जाहीर झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निकालात भाजपला सत्ता गमवावी लागली होती. वसुंधरा राजेंचं सरकार पडून काँग्रेसचे अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानातील सर्व जागांवर भाजपने बाजी मारत पुन्हा आपलं स्थान सिद्ध केले होते. पंरंतु, या निकालाने भाजप राजस्थानात आणखी पिछाडीवर पडले आहे.

शिवसेनेबद्दल नवाब मलिक याचं मोठं वक्तव्य..

लोकसभेवेळी उसळलेली मोदी लाट राजस्थानातून पुन्हा एकदा ओसरल्याचं चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. भरतपूर आणि बीकानेर महापालिकांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला, तरी नगरपालिका/नगरपरिषदांमध्ये त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. निवडणुकीआधी या ४९ पैकी २१ ठिकाणी भाजपची सत्ता होती. ती आता सहावर आली आहे. याउलट, काँग्रेसच्या खात्यात दोन पालिका वाढल्या असून ते २३ वर पोहोचले आहेत.

उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा; सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?

तर, तब्बल २० ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या हाती सत्तेची चावी असणार आहे. १६ नोव्हेंबरला या ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झालं होतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल या ठिकाणी भाजपला फायदेशीर ठरणार का, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, स्थानिक मुद्द्यांच्या आधारेच मतदारांनी मतदान केल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com