Corona virus: कोरोनामुळे चिंता वाढली! 9 महिन्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मृत्यू,'या' राज्यात JN.1चे सर्वाधिक रुग्ण

Corona Update: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांची तसेच सरकारची चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत या नवीन व्हेरायंटचे 110 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारपर्यंत, कोरोनाच्या नवीन प्रकाराचे 110 रुग्ण होते.
Corona Virus Update in India
Corona Virus Update in India esakal

भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत असल्याने बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. पश्चिम बंगालमध्ये नऊ महिन्यांहून अधिक कालावधीनंतर काल (गुरुवारी) कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाव्यतिरिक्त हा रुग्ण इतर अनेक आजारांनी ग्रस्त होता.

अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'या व्यक्तीला कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालमध्ये कोविड -19 मुळे एका व्यक्तीचा शेवटचा मृत्यू यावर्षी 26 मार्च रोजी झाला होता.

जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला नमुना

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींनी मृत व्यक्तीचे स्वॅबचे नमुने गोळा करून ते जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. सध्या राज्यात कोविड संसर्गाची एकूण 11 सक्रिय प्रकरणे आहेत. गुरुवारी संसर्गातून बरे झालेल्या तीन जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Corona Virus Update in India
Modi Ayodhya Tour: PM मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर, मंदिराच्या तयारीचा घेणार आढावा; अयोध्येला छावणीचं रुप

सध्या कर्नाटकात सर्वाधिक सक्रिय

गुरुवारी कोरोनाचे 692 नवीन रुग्ण आढळले. यानंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4097 वर पोहोचली आहे. संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले तर, गुरुवारी सायंकाळपर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील २, कर्नाटक, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Corona Virus Update in India
Winter Health Care : सांभाळा... हिवाळ्यात हृदयविकाराचा वाढतो धोका

नवीन प्रकारातील सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये

जर आपण कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराबद्दल बोललो तर, गुरुवारपर्यंत (डिसेंबर 28) भारतात 110 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६ प्रकरणे गुजरातमध्ये आहेत. यानंतर, कर्नाटकात 34 नवीन प्रकार, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 प्रकरणे आढळून आली आहेत.

Corona Virus Update in India
Asthma Patients : दम्याचे रुग्ण दाट धुक्यात मॉर्निंग वॉक करू शकतात का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com