esakal | लॉकडाऊनची मुदत वाढणार?; काय आहे संकेत?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus air india not allowed flight booking till 30th april

भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 हजार 500वर पोहोचली आहे. भारतात, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून, त्यापाठोपाठ केरळमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे.

लॉकडाऊनची मुदत वाढणार?; काय आहे संकेत?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन हा सर्वांत मोठा उपाय आहे. सध्या भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. येत्या 14 एप्रिलला हा लॉकडाऊन संपुष्टात येईल. पण, लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. देशात लॉक डाऊनची स्थिती असली तरी, कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. त्यामुळंच लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत कोणतिही अधिकृत घोषणा झालेली नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे संकेत?
केंद्र सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे वृत्त यापूर्वी फेटाळून लावले आहे. तसेच 14 एप्रिलनंतर त्यात वाढ होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. परंतु, सरकारची तयारी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याच्या दिशेनेच सुरू आहे. त्याचे संकेतही मिळू लागले आहे. सरकारने एअर इंडियाला 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाईटचे बुकिंग न स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळं लॉकडाऊन किमान 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असला तरी, या लॉकडाऊनच्या यशस्वीतेविषयी शंका उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यांवर येताना दिसत आहेत. गर्दी होत असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळं लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करण्याचा आणि लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा सरकार विचार करत आहे. युरोपमध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय कठीण आहे. त्यामुळं युरोपमधील देशांमध्ये लॉकडाऊनची शिस्त पाळली जात आहे. सध्या युरोपमधील बहुतांश सर्व देश लॉकडाऊन स्थितीत आहेत. भारतात लॉक डाऊनचे नियम पाळले गेले तरच कोरोनाची साथ आटोक्यात येणार आहे. अर्थात सरकारने यापूर्वीही लॉक डाऊन वाढवण्याची शक्यता नाकारली आहे. त्यामुळं हवाई सेवा बंद करून लॉकडाऊन शिथील करण्यात येईल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. 

आणखी वाचा - कोरोना हवेतून पसरत नाही!

आणखी वाचा - तबलिगी जमातमध्ये किती देशातून आले नागरिक?

भारतात मुंबई चिंतेचा विषय
भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 हजार 500वर पोहोचली आहे. भारतात, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून, त्यापाठोपाठ केरळमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत आतापर्यंत 17 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. मुंबईत ज्या वस्तीमध्ये कोरोना रुग्ण आढळतो त्या वस्तीलाच विलग केले जात आहे. त्या परिसरातून कोणालाही बाहेर जाण्याची किंवा कोणालाही त्या वस्तीत जाण्याची अनुमती दिली जात नाही. मुंबईत सध्या पोलिस, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना दिसत आहेत. त्यामुळं सध्या मुंबई चिंतेचा विषय ठरली आहे. 

loading image