esakal | Corona Update : 24 तासांत 41,806 नवे रुग्ण, 581 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Corona Update : 24 तासांत 41,806 नवे रुग्ण, 581 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Coronavirus in india, covid-19, latest updates : देशातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर झाल्यानंतर पुन्हा थोड्याफार प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 41 हजार 806 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर याच कालावधीत देशात 39 हजार 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी 581 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशाचा एकूण रिकव्हरी रेट 97.28 टक्केंवर पोहचला आहे.

देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.21 टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.15 टक्के इतका आहे. मागील 24 दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोदी सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत देशातील लसीकरणाने 39 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा: हद्दच झाली राव! दुचाकीवर सहाजणांना पाहून पोलीसही चक्रावले

हेही वाचा: इंग्लंडचा मालिकेवर कब्जा, स्फोटक फलंदाजीनं स्मृतीनं मनं जिंकली

देशाची कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण Total cases: 3,09,87,880

एकूण कोरोनामुक्त - Total recoveries: 3,01,43,850

उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,32,041

एकूण मृत्यू - Death toll: 4,11,989

एकूण लसीकरण - 39,13,40,491

मागील 24 तासांतील लसीकरण - 34,97,058

हेही वाचा: वाढदिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै 2021 पर्यंत देशात 43 कोटी 80 लाख 11 हजार 958 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. बुधवारी देशात 19 लाख 43 हजार 488 इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: दिलासा नाहीच; राज्यातील कोरोना निर्बंध तुर्तास कायम

राज्याची स्थिती काय? -

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. 8,602 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,44,801 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,06,764 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.17 % झाले आहे.

हेही वाचा: इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

8 राज्यात कडक लॉकडाउन -

देशातील 8 राज्यांमध्ये कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, तामिळनाडू, मिजोरम, गोवा आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

23 राज्य/केंद्रशासित प्रदेशांत आंशिक लॉकडाउन

देशातील 23 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. येथे निर्बंधासोबत सूट देण्यात आली आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नगालँड, आसम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्रप्रदेश आणि गुजरात या राज्यात आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे.

हेही वाचा: राज्यात लवकरच महाभरती; MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

loading image