esakal | 'गाय' राष्ट्रीय प्राणी व्हायला हवा; हायकोर्टाचं मत
sakal

बोलून बातमी शोधा

cow

'गाय' राष्ट्रीय प्राणी व्हायला हवा; हायकोर्टाचं मत

sakal_logo
By
अमित उजागरे

लखनऊ : वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. पण वाघाची ही ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. कारण, "गाय ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे, त्यामुळं गाय हा राष्ट्रीय प्राणी व्हायला हवा" असा असं मत अलाहाबाद हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं घेतलं ताब्यात

याप्रकरणी मत मांडताना न्या. शेखर कुमार यादव म्हणाले, "गाईला तिचे मुलभूत अधिकार बहाल करण्यासाठी आणि तिला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषीत करण्यासाठी संसदेत यासंदर्भात विधेयक आणायला हवं. उत्तर प्रदेशातील गोहत्या प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या जावेद नामक व्यक्तीनं जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज फेटाळताना न्या. यादव यांनी गोहत्येसंदर्भात आणखी कठोर कारवाई व्हावी," असंही मत नोंदवलं.

हेही वाचा: '12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांशी सकारात्मक चर्चा'

यावेळी न्या. यादव म्हणाले, "गाईचं संरक्षण करणं हे कोणा एका धर्माचं काम नाही. गाय हा भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळं प्रत्येक धर्माच्या संस्कृतीचं रक्षण करणं हे या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे."

loading image
go to top