राफेल डीलमध्ये कुणाला दिले कोट्यवधींचे 'गिफ्ट'? काँग्रेसकडून चौकशीची मागणी

rafale deal
rafale deal

नवी दिल्ली- ‘राफेल’ या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारत आणि फ्रान्समध्ये ३६ विमानांच्या खरेदीबाबत करार झाल्यानंतर या विमानांची उत्पादक कंपनी असणाऱ्या डसॉल्टने दहा लाख युरोंची रक्कम भारतातील एका मध्यस्थाला दिल्याचा खळबळजनक दावा मीडियापार्ट या फ्रेंच पोर्टलने केला आहे. यासाठी देशातील भ्रष्टाचारविरोधी संस्थेने तयार केलेल्या चौकशीचा हवाला देण्यात आला आहे. या दाव्यामुळे राफेलचे भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर आले असून काँग्रेसने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्या मध्यस्थाला ही रक्कम देण्यात आली तो अन्य एका संरक्षण व्यवहारामध्ये मोठी अफरातफर केल्याच्या प्रकरणातील आरोपी आहे, असेही या पोर्टलने म्हटले आहे. तत्पूर्वी डसॉल्टने मात्र या प्रकरणात हे पैसे राफेलच्या ५० प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा केला होता. निरीक्षकांनी मात्र या प्रतिकृती तयार करण्यात आल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे म्हटले आहे, असे मीडियापार्टकडून सांगण्यात आले. फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था एजन्सी फ्रॅंकाईस अँटीकरप्शन (एएफए) या संस्थेने डसॉल्टचे ऑडिट करायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीलाच हे आरोप करण्यात आले होते पण नंतर याच संस्थेने हा खटला वकिलांसमोर न मांडण्याची भूमिका घेतली होती.

गृहमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची नावं चर्चेत

क्लायंटला मोठ्या भेटवस्तू

या तपाससंस्थेने कंपनीची २०१७ मधील खाती पाहिली तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ५०८,९२५ युरो खर्च करण्यात आले होते. या पैशांची नोंद ही क्लायंटला देण्यात आलेल्या भेटवस्तू श्रेणीमध्ये नोंदविण्यात आली होते. यावेळी फ्रेंच तपास अधिकाऱ्यांना डेफ्साईस सोल्युशन या भारतीय कंपनीचे बिल देखील सादर करण्यात आले होते. ही कंपनी सुशेन गुप्ता यांच्या मालकीची आहे. गुप्ता यांची ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. डेफ्सीस ही डसॉल्टची भारतातील उपकंत्राटदार कंपनी आहे. सुशेन गुप्ता यांना याआधी अटक करण्यात आली होती पण नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

‘पीपीएफ’कडे आजच लक्ष का द्यायला हवे?

डेफ्सीसचे बिल जोडले

एएफएचा हा अहवाल मीडियापार्टने उघड केला आहे. यामध्ये डसॉल्टने त्यांच्याकडून देण्यात आलेल्या भेटवस्तूचे समर्थन केले होते. या भेट वस्तूची नोंद नेहमीपेक्षा मोठ्या भेटवस्तू अशी करण्यात आली होती. यासाठी डेफ्सीस सोल्युशन्सकडून प्राप्त केलेले बिल जोडण्यात आले होते. या बिलावर ३० मार्च २०१७ रोजीच्या तारखेचा उल्लेख आहे. डेफ्सीसकडून प्राप्त झालेल्या बिलानुसार त्यांना दिलेल्या ऑर्डरच्या ५० टक्के रक्कम मिळाल्याचे दिसून येते. म्हणजे या कंपनीला विमानाचे एक डमी मॉडेल तयार करण्यासाठी प्रत्येकी २० हजार युरो एवढी रक्कम मिळाली होती. ही एवढी रक्कम कशासाठी देण्यात आली होती हे मात्र डसॉल्टला सांगता आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com