esakal | दिल्लीतील वाढत्या कोरोनाचे कारण वायू प्रदुषण; पण लवकरच कमी होण्याची CM नी दिली ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळीच्या आधी एक दिवस एका डिजीटल प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय की, राजधानी दिल्लीतील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला वायू प्रदुषण हे प्रमुख कारण आहे.

दिल्लीतील वाढत्या कोरोनाचे कारण वायू प्रदुषण; पण लवकरच कमी होण्याची CM नी दिली ग्वाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळीच्या आधी एक दिवस एका डिजीटल प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय की, राजधानी दिल्लीतील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला वायू प्रदुषण हे प्रमुख कारण आहे. त्यांनी याबाबत शेजारी राज्यांनाही पराली जाळण्याबाबतचा दोष दिला. त्यांनी म्हटलं की ही पराली जाळल्यामुळेच प्रदुषण वाढत आहे. संपूर्ण एक महिना पूर्ण उत्तर भारत म्हणजे पंजाब. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये धूरच धूर दिसून येतो. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून हेच सुरु आहे. 

हेही वाचा - काँग्रेसशी मैत्री म्हणजे मित्र पक्षांना नुकसान; बिहारच नव्हे, इतर राज्यांतही बसला फटका
केजरीवाल यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हटलं की, परालीमुळे शेतकरी त्रस्त असतात. मात्र, आता असं होणार नाही कारण एग्रीकल्चर इन्स्टिट्यूटने याबाबतचा उपाय काढला आहे. त्यांनी म्हटलंय की संशोधकांनी बायो डी कंपोजर बनवलं आहे. जे परालीवर टाकल्यावर ती 20 दिवसांच्या आतच शेतात खत बणून जाते. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की दिल्ली सरकारने दिल्लीच्या 2000 एकर कृषी भूमीवर याचा फवारा केला आहे. 
केजरीवाल यांनी सांगितलं की, 24 गावांमध्ये 13 ऑक्टोबरपासून याचा फवारा केला गेला ज्याचे परिणाम येताहेत. पूसा इन्स्टिट्यूटने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, यामुळे शेतकरी आनंदात आहेत. केजरीवाल यांनी म्हटलंय की, परालीच्या समस्येवर उत्तर तर मिळालंय मात्र आता राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यांनी याबाबत आपला त्रागा व्यक्त करत म्हटलं की, दिल्लीच्या आसपासची राज्य सरकारे याचा अवलंब आतातरी करणारेत की प्रत्येक वर्षी प्रदुषणाने याचप्रकारे आपण त्रास सहन करत रहायचं आहे?

हेही वाचा - दिल्ली आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर
केजरीवाल यांनी म्हटलं की, त्यांनी अनेक शेतकऱ्यांसोबत बातचित केली. मात्र, शेतकऱ्यांना  पराली जाळायची नाहीये कारण ते जाळल्याने सर्वांत जास्त धूर तर त्यांच्या घराजवळच होतो. त्यांनी पुढे म्हटलं की, मीडिया फक्त दिल्लीत आहे म्हणून दिल्लीतल्या प्रदुषणाबाबत रान उठतं मात्र, प्रदुषण तर या गावांमध्येही होतं आहे. याबाबत अद्याप काही ठोस काम केलं गेलं नाहीये. प्रत्येक वर्षी फक्त या मुद्यावरुन वाद आणि राजकारणच होतं. मात्र काही काम होत नाही. पण मी पूसा इन्स्टिट्यूटचे आभार मानू इच्छितो. 

loading image