८०० वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचारविरुद्ध लढा देणारे बसवेश्वर कोण? जाणून घ्या| Basweshwar Jayanti 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा बसवेश्वर महाराज

८०० वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचारविरुद्ध लढा देणारे बसवेश्वर कोण? जाणून घ्या

आज लिंगायत समाजाचे समाजसुधारक बसवेश्वर भगवान यांची जयंती आहे. हे बसवेश्वर कोण होते आणि समाज सुधार चळवळीत त्यांचे काय महत्त्वाचे योगदान आहे, हे आज आपण जाणून घेऊया.

महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य कुटी प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांना विश्वगुरू, भक्ती भंडारी आणि बसव असेही म्हणतात. लिंग, जात, सामाजिक दर्जा यांचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देण्याबाबत त्यांनी नेहमी प्रयत्न केले. ते निराकार ईश्वराच्या संकल्पनेचे समर्थक होते.

हेही वाचा: राहुल गांधी नाईटक्लबमध्ये काय करतायत? काँग्रेसने दिलं उत्तर

शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले.

कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.

हेही वाचा: राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा येणार? BMC ने पाठवली नोटीस

बसवेश्वर हे असेच एक संत होते, ज्यांनी ८०० वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी लढा दिला. त्यावेळी, ते शिवाचे उपासक होते आणि त्यांनी मठ, मंदिरांमध्ये पसरलेल्या दुष्कृत्ये, अंधश्रद्धा आणि श्रीमंतांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. बसवेश्वर हे असे एक संत होते ज्यांच्या नावाने कन्नड साहित्याचा संपूर्ण कालखंड ओळखला जातो.

बसवेश्वर स्वतः ब्राह्मण कुटुंबात जन्मले. त्यांनी ब्राह्मणांच्या वर्चस्ववादी व्यवस्थेलाही विरोध केला. जन्म आधारित व्यवस्थेऐवजी त्यांचा कर्मावर आधारित व्यवस्थेवर विश्वास होता. दुष्कृत्ये दूर करण्यासाठी त्यांनी लिंगायत या नव्या संप्रदायाची स्थापना केली.

हेही वाचा: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! वाघेलांनंतर 'या' आमदारानं दिला राजीनामा

कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यांतील लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ झालेली दिसतात. बसवण्णांचे समाजपोषक विचार आणि आचार याने प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले. सर्वसामान्यांच्या उन्नतीची कामे करण्यात बसवण्णांचा हातखंडा होता. निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले. सत्ता आणि वैभव, कीर्ती पायाशी लोळण घेतानाही बसवण्णा आध्यात्मिक नीतिमूल्यांपासून ढळले नाहीत. या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते.

Web Title: Do You Know Who Is Basaveshwara Who Fight Against Gender Or Social Discrimination Superstitions And Rituals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top