Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती

स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यात अमूल कंपनीचे संस्थापक डॉ वर्गीस कुरियन यांचाही मोलाचा वाटा
Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती

Dr.Verghese Kurien Birthday story : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशातील प्रत्येक घटकाचा सहभाग होता, असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. देशाचा इतिहास एकापेक्षा जास्त बलिदानांच्या कथांनी बनलेला आहे. यात कधी मीठाचा सत्याग्रह तर कधी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा तडीस गेला. स्वातंत्र्याच्या या प्रदीर्घ लढ्यात दुधाचेही योगदान आहे. यात अमूल कंपनीचे संस्थापक डॉ वर्गीस कुरियन यांचाही मोलाचा वाटा होता. आज त्यांचा स्मृतीदीन आहे.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
CoronaFighters : कशासाठी पोटासाठी, सामाजिक भान जपण्यासाठी! कोरोना लढ्यात त्यांचा मोलाचा वाटा 

दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली “एनडीडीबी’ने “ऑपरेशन फ्लड’ सुरू केले आणि अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Rakhi Sawant Birthday: एक मुका आणि करियर घडलं, मिका आणि राखीच्या ऐतिहासिक किसची गोष्ट

श्वेत क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. असे असले तरी, त्यांना परदेशात जाऊन वैज्ञानिक बनायचे होते. पण, तरीही ते या व्यवसायाकडे का वळले आणि त्यांनी ही क्रांती घडवली कशी हे पाहुयात.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Salim Khan Birthday: पत्नी, चार मुलं, घरातून विरोध असतानाही हेलनच्या प्रेमात वेडे होते सलीम खान..

वर्गीस कुरियन यांचा जन्म केरळ राज्यातील कोझिकोड शहरात झाला. त्यांचे वडील सरकारी रूग्णालयात शल्यतज्ज्ञ होते. कुरीयन यांचे प्राथमिक शिक्षण तामिळनाडूतील गोबीचेट्टीपालयम गावात डायमंड जुबिली हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाले. कुरियन यांनी मद्रासच्या लॉयोला कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळविली.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Tushar Kapoor Birthday: लग्न न करताच झाला बाप! सिंगल राहण्यामागचं 'हे'आहे कारण..

विद्यार्थी दशेत त्यांनी लॉयोला कॉलेजचे क्रिकेट, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि टेनिसमध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मद्रास विश्वविद्यालयाची मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी घेतली. तर पुढील शिक्षणासाठी ते मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत पोहोचले.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Cyber Crime News : अश्लिल Vedio Callच्या बळावर उकळली खंडणी

मेकॅनिकल इंजिनिअरींगसोबत मेटॅलर्जीत अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीबरोबर डेअरी इंजिनीअरिंग हाही विषय घेणे अनिवार्य होते. त्यामूळे मिशिगनमधून मास्टर्सची पदवी मिळवून ते भारतात परतले. डेअरी इंजिनीअर म्हणून कुरियन १९४९ ला आणंदच्या गव्हर्नमेंट रिसर्च डेअरीत पाच वर्षांच्या कालावधीसाठी रुजू झाले. तेथे त्यांची भेट गांधी विचारांचा पगडा असलेले कार्यकर्ते त्रिभुवनदास पटेल यांच्याशी झाली.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Rava Batata Puri Recipe : पुरी खायला आवडते? पण कधी रवा बटाटा पुरी ट्राय केली आहे का?

त्रिभुवनदास यांना त्याकाळी लहान दूध उत्पादकांसाठी आणंद येथे सहकारी दूध संघटना स्थापन करायची होती. मध्यंतरीच्या काळात १९५२-५३ मध्ये कुरियन यांनी भारत सरकारच्या पुरस्काराने न्यूझीलंडमध्येही दुग्ध यांत्रिकी शिक्षण घेतले. तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील सहकारी दूध व्यवस्थेचाही अभ्यास केला होता.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Vitamin D Recipe : उन्हात न बसताही 'हा' पुलाव खाऊन पूर्ण करा व्हिटॅमिन डी ची कमतरता

गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या निषेधापासून ही कथा सुरू झाली. 1946 मध्ये ब्रिटीश कंपनी पोल्सन डेअरीचे खेडा जिल्ह्यातील दूध व्यवसायावर वर्चस्व होते. पोल्सन डेअरीच्या मनमानी कारभारावर जिल्ह्यातील शेतकरी नाराज होते. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सरदार वल्लभभाई पटेल यांना सांगितल्या.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Winter Season Food : थंडीचा महिना...गरम अन् पौष्टिक आहार खा!

14 डिसेंबर 1946 रोजी सरसरदार पटेल यांच्या सल्ल्याने त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड सुरू करण्यात आली. यावेळी केडीसीएमपीएलचे काम कमी होते. भारत सरकारकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीअंतर्गत कुरीयन यांना सहा महिने आनंद येथील सरकारी डेअरीमध्ये काम करावे लागले. डॉ. कुरियन यांना अमेरिकेत शिक्षण घेऊन न्यूक्लियर फिजिक्स आणि मेटलर्जीमध्ये शास्त्रज्ञ व्हायचे होते. मात्र, देशाला दुधात स्वयंपूर्ण बनवण्याच्या लढ्याचा ते एक भाग बनल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Winter lifestyle : गुलाबी थंडी वाढताच बदलली लाईफस्टाईल; फिरणे अन् व्यायामाचे प्रमाण वाढले

दोन गावांपासून सुरुवात करून ते 222 जिल्ह्यांपर्यंत पोहोचले. 1960 च्या दशकात भारतातील दुधाचे उत्पादन 20 दशलक्ष टन होते, जे डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कार्यकाळात 2011 पर्यंत वाढून 122 दशलक्ष टन झाले. डॉ. वर्गीस या मोहिमेत सामील होण्यापूर्वी केवळ दोन गावातील दुग्ध संस्था केडीसीएमपीएलशी संबंधित होत्या. वर्गीस यांनी या मोहिमेची व्याप्ती वाढवली. लाल बहादूर शास्त्रींच्या राष्ट्रीय दुग्ध धोरणामुळे ही संपूर्ण मोहीम मोठी झाली.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Youth Health : तरूणांना होणार स्लीप पॅरेलिसिस नेमका काय?

खास गोष्ट म्हणजे, 'मिल्कमॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती स्वतः दूध पीत नव्हती. कारण त्यांना दूध आवडत नव्हते. म्हशीच्या दुधापासून पावडर बनवण्याची कल्पना देखील कुरियन यांचीच होती. यापूर्वी संपूर्ण जगात दुधाची पावडर फक्त गायीच्या दुधापासून बनवली जात होती.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Breakfast Recipe : पोटभर आणि चविष्ट नाश्त्यासाठी बनवा झटपट गव्हाचा दलिया

आज अमूल ब्रँडची उलाढाल 52 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमूल ब्रँड अंतर्गत कार्यरत आहे. आज देशातील 28 राज्यांमधील 222 जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात आहे.

Dr.Verghese Kurien Birthday : अमेरिकेत शास्त्रज्ञ होण्यासाठी गेलेला इंजिनियर भारतात परतला अन् घडवली दूधक्रांती
Oats Bhurji Recipe : सकाळी नाश्त्याला खा हेल्दी फुड; ओट्स आणि अंड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा

देशभरातील १.६६ कोटी दूध उत्पादक शेतकरी अमूलशी संबंधित आहेत. सध्या अमूल कंपनीचे एकूण 7.64 लाख सदस्य आहेत. कंपनी दररोज 33 लाख लिटर दूध संकलन करते. कंपनीची प्रतिदिन 50 लाख लिटर हाताळणी क्षमता आहे. जगातील दूध उत्पादनात कंपनीचा वाटा 1.2 टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com