काय सांगता? चक्क राष्ट्रीय फुलपाखरासाठी पार पडली निवडणूक

Election passed for National Butterfly
Election passed for National Butterfly

पुणे : आजपर्यंत तुम्ही राजकीय पदांसाठी झालेल्या निवडणुका पाहिल्या असतील. परंतु, देशात प्रथमच राष्ट्रीय फुलपाखरांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशभरातील 60 हजाराहून अधिक लोकांनी मतदान केले आणि त्यात सर्वाधिक मतदान हे महाराष्ट्रातून झाले. 

राष्ट्रीय फुलपाखरू निवड संघाचे समन्वयक दिवाकर ठोंबरे म्हणाले,"लॉकडाउनच्या काळामध्ये राष्ट्रीय फुलपाखरू निवडीसाठीची ही अभिनव कल्पना फुलपाखरू अभ्यासकांना अधिकच भावली. त्यासाठी सर्व राज्यातील 110 फुलपाखरू अभ्यासकांशी संपर्क केला त्यातील 51 पेक्षा अधिक अभ्यासकांनी यात सक्रिय सहभाग घेतला होता.'' निवडणुकीत सर्वाधिक मते हळदी-कुंकू (कॉमन जेझबेल), ताम्रपर्ण (ऑरेंज ओक्‍लिफ) आणि कृष्णा पीकॉक या तीन फुलपाखरांना पडली आहे. अंतिम निकालासाठी मात्र आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. संबंधित अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून लवकरच ते निकालाच्या आधारे राष्ट्रीय फुलपाखराची घोषणा करतील, असा विश्‍वास ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

गुगल फॉर्मच्या माध्यमातून ही निवडणूक घेण्यात आली होती. या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. कृष्णमेघ कुंटे, दिवाकर ठोंबरे, डॉ कलेश, अशोक सेनगुप्ता, शरण व्यंकटेश, स्वराज राज, डॉ. विजय बर्वे, अमोल पटवर्धन, हेमंत ओगले, जुधाजीत दास गुप्ता, डॉ शाखा शर्मा डॉ विलास बर्डेकर आदींचा सहभाग आहे. 

फुलपाखरांचे महत्त्व 
मधमाश्‍यांइतकेच फुलपाखरेही परागीभवनाचे काम करतात. त्यांचे अस्तित्व हे त्या ठिकाणच्या सुदृढ वनस्पती संपदेचे, एक महत्त्वाचे परिमाण आहे. फुलपाखरे हा अन्नसाखळी आणि जैव साखळीमधील एक महावपूर्ण घटक आहे. अनेक पक्षी आणि कीटक अन्न म्हणून फुलपाखरू खातात. 

असे होते निकष 
- दिसायला सुरेख, करिश्‍मायुक्त असावे 
- सर्वत्र आढळणारे अथवा अतिदुर्मिळ नसावे 
- राज्य फुलपाखरांना वगळण्यात आले. 
- पीक नष्ट करणाऱ्या फुलपाखराचा समावेश नाही 
- तरुण वर्गाला आकर्षित करणारे फुलपाखरू असावे 
- त्यांची वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवणारी असावी. 
- नर व मादी मध्ये जास्त फरक नसलेले फुलपाखरू असावे. 


Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

मतदानाची आकडेवारी 
राज्य : मतदान 
महाराष्ट्र : 18,887 
तमिळनाडू : 4749 
छत्तीसगड : 4754 
पश्‍चिम बंगाल : 3676 
कर्नाटक : 3198 


वयोगटानुसार मतदान : 
वयोगट : टक्केवारी 
15 ते 30 : 63.87 
31 ते 50 : 29 
50 च्या पुढे : 7.13 

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com