Unemployment Rate | देश बेरोजगारीच्या गर्तेत; एकाच महिन्यात दीड कोटी लोकांनी गमावला रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employment
देश बेरोजगारीच्या गर्तेत; एकाच महिन्यात दीड कोटी लोकांनी गमावला रोजगार

देश बेरोजगारीच्या गर्तेत; एकाच महिन्यात दीड कोटी लोकांनी गमावला रोजगार

देशातली बेरोजगारीची समस्या आणखी गंभीर होत असल्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. जून महिन्यात देशात बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कृषी क्षेत्रात जवळपास दीड कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. (Unemployment Rate)

हेही वाचा: देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, मोदींच्या धोरणांवर राहुल गांधींची टीका

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ग्रामीण भागात बेरोजगारीचं प्रमाण (Unemployment Rate) ८.३ टक्क्यांवर पोहोचलं आहे. मे महिन्यात हे प्रमाण ७.३० टक्के होतं. शहरी भागातली परिस्थिती थोडीफार चांगली आहे. मेमध्ये शहरी भागात बेरोजगारीचं प्रमाण ७.१२ टक्के होतं तर जूनमध्ये हे प्रमाण ७.३ टक्के झालं आहे. CMIE चे संचालक महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन नसलेल्या महिन्यांपैकी रोजगाराच्या प्रमाणात झालेली ही सर्वात मोठी घट आहे.

हेही वाचा: कोट्यवधींचा रोजगार देणाऱ्या क्षेत्राला लागली घरघर, चीन ठरतंय जबाबदार ?

व्यास यांनी पुढे सांगितलं की, या महिन्यात जवळपास दीड कोटी रोजगार कमी झाले असून बेरोजगारीत केवळ ३० लाखांची वाढ झाली आहे. श्रमिक गटातून अन्य कामगार बाहेर पडले आहेत. कार्यरत मनुष्यबळात जवळपास एक कोटींची घट झाली आहे. ही घट मुख्यतः असंघटित क्षेत्रात झाली आहे. मान्सूनमुळे (Monsoon) कामगारांची संख्या घटली आहे, हे चिंताजनक आहे.

सर्वाधिक म्हणजे ३०.६ टक्के बेरोजगारी हरियाणामध्ये आहे. त्याखालोखाल राजस्थानमध्ये २९.८ टक्के, आसाममध्ये १७.२ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १७.२ तर बिहारमध्ये बेरोजगारीचं प्रमाण १४ टक्के आहे.

Web Title: Employement Rate India See Massive Fall In Employment In June Cmie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Employmentunemployment