Farooq Abdullah: इंडिया आघाडीला आणखी एक झटका! आता फारुख अब्दुल्लांचाही 'एकला चलो'चा नारा

एनडीएसोबत जाण्याचेही दिले संकेत
Farooq Abdullah
Farooq Abdullah

नवी दिल्ली : इंडिया आघाडीला आता आणखी एक झटका बसला आहे. कारण नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वोसर्वा फारुख अब्दुल्ला यांनी एकला चलोचा नारा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. यामुळं जसं जशी लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, तशा देशातील राजकीय घडामोडी वाढायला लागल्या आहेत. (farooq abdullah another blow to india block now he has taken descion going single)

'एकला चलो'चा नारा

फारुख अब्दुल्ला म्हणाले, "मला माहितीए की जम्मू-काश्मीरमध्ये आता विधानसभा आणि लोकसभा निवडणूक सोबतच पार पडतील. त्यामुळं जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे तर मी हे स्पष्ट करु इच्छितो की, नॅशनल कॉन्फरन्स एकटीच निवडणूक लढेल आणि यात कुठलीही शंका नाही. (Marathi Tajya Batmya)

देशहितासाठी मला जे काही करावं लागेल ते मी करेन. त्याचबरोबर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारलं असताना त्यांनी म्हटलं की, जर त्यांनी बोलावलं तर कोण चर्चेसाठी तयार नसेल" (Latest Marathi News)

Farooq Abdullah
Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर घेतलं पाणी

एनडीएमध्ये सामिल होण्याचे संकेत

पुढे बोलताना अब्दुल्ला म्हणाले, आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकट्यानं लढणार आहोत. कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाणार नाही. त्याचबरोबर भविष्यात आम्ही एनडीएमध्ये सामिल होण्याच्या शक्यताही नाकारत नाही. इंडिया आघाडीत जागा वाटपाची चर्चा निष्फळ ठरल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com