उत्तर प्रदेशात गर्भवती 14 वर्षीय मुलीची हत्या

father kills pregnant daughter in uttar pradesh
father kills pregnant daughter in uttar pradesh

लखनौ (उत्तर प्रदेश): हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संताप निर्माण झाला असून, आजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्याने 14 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याने तसेच बाळाच्या वडिलांचे नाव सांगण्यास नकार दिल्यामुळे मोठ्या मुलाच्या मदतीने हत्या केली.

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून बलात्कार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाने तर देश हादरून गेला आहे. हाथरसमध्येच सहा वर्षाच्या मुलीवर तिच्या मावसभावानेच बलात्कार केला असून, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. यानंतर वडिलांनीच मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, 'गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतदेहाचे शीर कापण्यात आले होते. गावकऱ्यांनीच याबाबतची माहिती पोलिसांना कळवली तपासादरम्यान मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. मुलीचे कोणासोबत तरी संबंध असल्याचा संशय होता. प्राथमिकदृष्ट्या हे ऑनर किलिंग दिसत असून, मुलीच्या वडिलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.'

पोलिस अधीक्षक एस आनंद यांनी सांगितले की, 'मुलगी गर्भवती होती. तिच्या वडिलांनी याला जबाबदार कोण? असे विचारलं तेव्हा तिने काहीही सांगण्यास नकार दिला. यानंतर चिडून वडिलांनी मुलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर शीर कापून मृतदेह नाल्यात टाकून दिला होता. मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून, तिचा भाऊ फरार आहे. मुलीसोबत संबंध असणाऱ्याचाही शोध घेतला जात आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com