निवृत्त विंग कमांडर डॉ. विजयलक्ष्मी यांचे निधन

first female officer of the air force dr vijayalakshmi ramanan passes away
first female officer of the air force dr vijayalakshmi ramanan passes away

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या निवृत्त विंग कमांडर डॉ. विजयलक्ष्मी रमानन व्ही.एस.एम (वय 96) यांचे रविवारी रात्री (ता. 18) मुलीच्या घरी निधन झाले. त्या हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

डॉ. विजयालक्ष्मी या 2 ऑगस्ट 1955 रोजी हवाई दलात अधिकारीपदी नियुक्ती झाली. 22 ऑगस्ट 1972 रोजी विंग कमांडरपदी त्यांना बढती मिळाली. 28 फेब्रुवारी 1979 मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या.

1950 ते 1970च्या काळात महिलांनी हवाई दलासारख्या पुरुषांची संख्या असलेल्या ठिकाणी काम करणे सोपे नव्हते. यासाठी खूप जास्त तयारी आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते. 1955 या काळात त्या हवाई दलात अधिकारी म्हणून काम करीत होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, सुरुवातीच्या दिवसात मला हवाई दलात काम करायची भीती वाटत होती. कारण यापूर्वी मी पुरुषांसोबत काम केले नव्हते. मात्र त्यात, शिस्त आणि कामप्रती असलेल्या प्रेमामुळे मी यश संपादन केले. हवाई दलात देशासाठी काम करीत असतात घर, संसार हा दुय्यम असतो. प्रथम तुमचे काम महत्त्वाचे असते. त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ ट्विटरवर आहे. यामध्ये त्यांनी आपला हवाई दलाचा अनुभव शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com