
दिल्ली पोलिसांनी अखेर आज दुपारी शेतकऱ्यांना सिंघ-टिकरी व धौलपूर-आग्रा सीमांवरून दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी दिली. पोलिस व आंदोलक शेतकरी यांच्यातील समझोत्यानुसार बुराडी येथील संत निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना सशर्त परवानगी दिली.
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी अखेर आज दुपारी शेतकऱ्यांना सिंघ-टिकरी व धौलपूर-आग्रा सीमांवरून दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी दिली. पोलिस व आंदोलक शेतकरी यांच्यातील समझोत्यानुसार बुराडी येथील संत निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना सशर्त परवानगी दिली. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी बुराडी येथे जाण्यास नकार देऊन संसद भवनावर मोर्चा काढणार असे जाहीर केल्याचे वृत्त आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाना, उत्तर प्रदेश व दिल्ली पोलिसांनी केलेले प्रयत्न या हजारो शेतकऱ्यांनी आपल्या वज्रनिर्धाराने आज उधळून लावले.
बिहार - भाजपने सुशील कुमार मोदींना राज्यसभेची उमेदवारी देऊन केली डबल गेम
कोरोनाची सबब पुढे करून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी, बिहारच्या व अन्य निवडणूका व राजकीय सभांवेळी कोरोना नव्हता का ? असा प्रतिप्रश्न केला. दुपारपर्यंत आंदोलक शेतकरी व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा व चकमकी असे दोन्हीही सुरू राहिले. या दरम्यान दिल्लीतील ९ क्रीडा मैदानाचे जेलमध्ये रूपांतर करण्यास परवानगी देण्याची केंद्राची मागणी आम आदमी पक्षाच्या राज्य सरकारने स्पष्टपणे फेटाळून लावली. शेतकऱ्यांचे आंदोलक पूर्णपणे अहिंसक आहे. त्यांच्या मागण्याही योग्य आहेत.
भारत आर्थिक मंदीच्या दिशेनं; दुसऱ्या तिमाहीत जीडीपी -7.5 टक्क्यांवर
केंद्राने त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजेत. अहिंसापूर्ण आंदोलन करण्याचा हक्क राज्यघटनेने दिला आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांना तुरूंगात डांबू शकत नाही, त्यामुळे मैदानांना जेलमध्ये बदलण्याची गृह मंत्रालयाची मागणी दिल्ली सरकार नामंजूर करते, अशा स्पष्ट शब्दांत अरविंद केजरीवाल सरकारने गृह मंत्रालयाला नकार दिला. अखेर दुपारी पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास सशर्त परवानगी दिली.
हे वाचा - भारत आर्थिक मंदीच्या दिशेनं; दुसऱ्या तिमाहीत जीडीपी -7.5 टक्क्यांवर
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बुराडी येथील मैदानात प्रदर्शन करण्यास परवानगी दिल्याचे क्रांतिकारी किसान संघटनेचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी सांगितले. यादरम्यान स्वराज आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव हेही कार्यकर्त्यांसह बुराडी येथे पोहोचले. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून आलेले सुमारे ४०० कार्यकर्तेही आहेत.
हे वाचा - कोरोना काळातही US मधील श्रीमंतांच्या संपत्तीत 7,44,20,48,88,00,000 रुपयांची वाढ
ठळक घडामोडी
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना परवानगी दिल्यानंतर आता केंद्राने त्यांच्या मागण्यांबाबत त्वरित चर्चा सुरू करावी.
- कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री, पंजाब
Edited By - Prashant Patil