विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सुनील गावस्करांचंही भाष्य, म्हणाले...

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

आपण एकजुटीनेच पुढे जाऊ शकतो. जर आपण एकत्र असू तरच जिंकू शकतो, हे खेळाने आपल्याला शिकवले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवार (ता.10) पासून देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू केला. या मुद्द्यावरून देशभरात विरोधी राजकीय पक्ष, विद्यार्थी तसेच नागरिकांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही घुसखोरांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी यावर भाष्य केल्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनीही आपले मत व्यक्त केले. 

- 'तो' सध्या काय करतो! 

''देश सध्या संकटात सापडला आहे. विद्यार्थी वर्गांऐवजी रस्त्यावर दिसत आहेत. मात्र, यातून आपण सर्व देशवासिय नक्की बाहेर पडू. या अगोदर आलेल्या संकटांतूनही आपण मार्ग काढला आहे,'' असे प्रतिपादन गावस्कर यांनी केले. 

येथे आयोजित 26 व्या लालबहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. गावस्कर पुढे म्हणाले, देशातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या काहीजणांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं आहे. त्यांनी अभ्यासाला प्राथमिकता दिली पाहिजे.

- बुमरा, पुनम यादवला बीसीसीआयचे प्रतिष्ठेचे पुरस्कार

एकत्र असू तरच जिंकू शकतो

देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कारण आपण एकजुटीनेच पुढे जाऊ शकतो. जर आपण एकत्र असू तरच जिंकू शकतो, हे खेळाने आपल्याला शिकवले.

या आधी आलेल्या बऱ्याच संकटांवर भारतीयांनी मात केली आहे. यावरही मात करून सामर्थ्यवान देश घडविण्यासाठी आपण एकत्रितपणे पुढे जाऊ. अशी आशा गावस्कर यांनी व्यक्त केली.

- T20 World Cup : भारतीय संघाची घोषणा; 15 वर्षीय क्रिकेटपटूचा समावेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Indian cricketer Sunil Gavaskar opens up on students protests