रेल्वे प्रवाशांनो तिकिटावर मिळवा 10 टक्के डिस्काऊंट, जाणून घ्या ऑफर

raiway
raiway

नवी दिल्ली- रेल्वेकडून प्रवाशांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्याऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रत्येक तिकीट बुकिंगवर 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. सिटिंग चार्ट तयार झाल्यानंतर आणि बर्थमध्ये काही जागा शिल्लक असल्यास प्रत्येक तिकिट बुकिंगवर तुम्हाला 10 टक्के डिस्काऊंट मिळू शकेल. यासाठी एकच अट असणार आहे की, तुम्हाला रेल्वे थांब्यापासून निघण्याआधी 30 मिनिटे अगोदर तिकीट बुकिंग करता येणार आहे. तुम्ही काऊंटरवरुन किंवा  IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट बुकिंग करु शकता. ही सुविधा सर्व स्पेशल ट्रेनसाठी उपलब्ध असणार आहे. 

मेट्रो, स्मार्ट सिटीच्या कामाचा आज लेखाजोखा 

उदाहरणार्थ, प्रवाशाने रेल्वे निघण्याआधी 30 मिनिटापूर्वी तिकिट बुकिंग केली असल्यास 2,760 रुपयांचं एसी तिकीट 2,500 रुपयांना मिळेल. एसी Tier टूचे तिकीट 1,645 रुपये असल्यास ते तुम्हाला 1,490 रुपयांना मिळेल. तसेच  AC Third चे तिकीट 1,165 रुपयांना असल्यास ते 1,060 रुपयांना मिळेल. स्लिपर क्लासचे तिकीट 445 रुपयांऐवजी 405 रुपयांना बुक करता येईल. जनरल श्रेणीतील 260 रुपयांचे तिकीट 240 रुपयांना मिळेल. 

गोरखपूर, अहमदाबाद, मुंबई आणि सिंकदराबाद या मार्गे धावणाऱ्या रेल्वेंसाठी सध्या कन्फर्म तिकीट उपलब्ध नाही. तसेच प्रवाशी उपलब्ध नसल्याने अनेक रेल्वे वेगळ्या मार्गाने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेंची संख्या कमी करण्यात आली आहे, तसेच अनेक ट्रेन्स कॅन्सल करण्यात आल्या आहेत. 

Fire at Serum Institute : आगीची दुर्घटना की घातपात

पब्लिक रिलेशन ऑफिसर पंकज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,  02573/02574 आनंद विहार टर्मिनल्स, मुझफ्फरपूर- आनंद विहार टर्मिनल्स आणि 04060/04059 नवी दिल्ली- वाराणसी- नवी दिल्लीला गोरखपूरमार्गे जाणाऱ्या स्पेशल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्याने सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com