CERVAVAC Vaccine : केंद्र मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शालेय मुलींना मिळणार सर्वाइकल कॅन्सरची लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CERVAVAC Vaccine

CERVAVAC Vaccine : केंद्र मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शालेय मुलींना मिळणार सर्वाइकल कॅन्सरची लस

CERVAVAC Vaccine : महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा वाढता धोका रोखण्यासाठी मोदी सरकारकडून एक मोठी योजना तयार करण्यात आली आहे. याबाबत द हिंदूने वृत्त प्रकाशित केले आहे.

Also read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: सीरमचं मोठं पाऊल! गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लवकरच स्वदेशी लस

या योजनेंतर्गत केंद्र सरकार 9 ते 14 वयोगटातील मुलींना शाळेतच CERVAVAC चे लसीकरण करणार आहे. ज्या मुलींना ही लस शाळेत घेता येणार नाही, त्यांच्यासाठी ही लस आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिली जाणार आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपच्या (NTAGI) शिफारशीनंतर केंद्राने ही मोहीम तयार केली आहे. या लसीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानेदेखील मान्यता दिली आहे.

हेही वाचा: Pele Colorectal Cancer: दिग्गज फुटबॉलर पेलेंना झालाय कोलन कॅन्सर! या आजारात नेमकं काय होतं जाणून घ्या

या मोहीमेअंतर्गत 9 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना एक वेळची कॅच-अप लस दिली जाणार आहे. एका संयुक्त पत्रात, केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळांना तशा सूचना केल्या आहेत.

शाळंमध्ये एचपीव्ही लसीकरण केंद्रे आयोजित करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी प्रत्येक सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये निगराणीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यासगी सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: गर्भाशय कर्करोग ग्रस्त महिलांना दिलासा; टाटा रुग्णालाकडून तंत्रज्ञानाचा वापर

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग म्हणून पाहिले जाते. जागात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रकरणांमध्ये भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत.

द लॅन्सेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की, जागतिक स्तरावर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या प्रत्येक चार मृत्यूंपैकी एक मृत्यू भारतात होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.