आता जिओ कोणता नवीन धमाका करतंय? वाचा सविस्तर!

Jio-Mart
Jio-Mart

मुंबई : 'रिलायन्स जिओ'वर रोजच धन वर्षाव सुरू आहे. आता लवकरच रिलायन्स रिटेलच्या ऑनलाईन ऑर्डरिंग प्लॅटफर्म जिओ मार्टचे कामकाज सुरू होत आहे. 

देशभरात झालेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने लोकांपर्यंत घरपोच वस्तूंची डिलिव्हरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिओ मार्टने महाराष्ट्रातील 15 शहरांमध्ये बीटा ट्रायलला सुरुवात केली आहे. www.jio.com या संकेतस्थळावर जाऊन लोकांना घरगुती लागणाऱ्या वस्तूंची मागणी नोंदवता येणार आहे. 

महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि इतर शहरातील नागरिक किराणा सामान, भाज्या, फळे आणि इतर वस्तूंची ऑर्डर देऊ शकतात. शिवाय छापील किमतीपेक्षा (एमआरपी) कमीतकमी 5 टक्के कमी किंमतीत वस्तू उपलब्ध करून देणार आहे.

इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील किंमतींच्या तुलनेत जिओमार्ट उत्पादनांना स्पर्धात्मक किंमत देते. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना फळे, ब्रँडेड पॅकेज्ड पदार्थ, शीतपेये, घरगुती आणि 
स्वयंपाकघरातील साफसफाईच्या वस्तू उपलब्ध करून देणार आहे. 

विस्ताराची योजना
जिओमार्टकडून उत्पादन आणि पुरवठा साखळी सामान्य होताच भविष्यात याचा विस्तार केला जाणार आहे. कोविड-19 च्या उद्रेकाच्या सध्याच्या घडीला 'होम डिलिव्हरी' ही काळाची गरज आहे. आजच्या  इकोसिस्टममधील अकार्यक्षमता आणि निकृष्ट दर्जा दूर करून जिओमार्टचे उद्दीष्ट येत्या काळात ग्राहक, उत्पादक आणि व्यापार्‍यांना लक्षणीय नवीन मूल्य हस्तांतरित करण्याचे आहे.

रिलायन्सच्या अखेरच्या वार्षिक सभेत जियोमार्ट पुढाकाराबद्दल बोलताना आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले होते की, या नवीन वाणिज्य उपक्रमामुळे 'एंड-टू-एंड डिजिटल' आणि भौतिक वितरण पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाची भागीदारी उत्पादक, व्यापारी, छोटे व्यापारी/किराणा, ग्राहक ब्रँड आणि ग्राहक यांना जोडेल असेही त्यांनी नमूद केले होते.

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाद्वारे जिओमार्ट प्लॅटफॉर्म सेवेची चाचणी
एप्रिलच्या अखेरीस कंपनीने नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील रहिवाशांसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाद्वारे जिओमार्ट प्लॅटफॉर्म सेवेची चाचणी सुरू केली. त्यानंतर आता एक पाऊल पुढे टाकत देशातील अनेक मोठ्या ते छोट्या शहरांमध्ये  विस्तार वाढविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com