World Record : चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियममध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Human Indian Flag World Record

World Record : चंदीगडच्या स्टेडियममध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा

Human Indian Flag World Record नवी दिल्ली : देशाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली आहे. चंदिगडमधील क्रिकेट स्टेडियममध्ये (Cricket Stadium) मानवी साखळी करून तिरंगा (Indian Flag) फडकवण्यात आला. या तिरंग्यात ७,००० विद्यार्थ्यांनी मानवी साखळी बनवून विश्वविक्रमात आपली भूमिका बजावली.

१५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आजपासून घरोघरी ‘हर घर तिरंगा’ सुरू झाली आहे. चंदीगडमधील सेक्टर १६ येथील क्रिकेट स्टेडियमवर सर्वांत मोठ्या मानवी साखळीने तिरंगा (Indian Flag) फडकवण्यात आला.

हेही वाचा: Urmila Nimbalkar : स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी पहिली मराठी YouTuber

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री मीनाक्षी लेखी, चंदीगडचे (Chandigarh) प्रशासक बनवारीलाल पुरोहित आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त, एनआयडी फाऊंडेशन आणि चंदीगड विद्यापीठाने आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमच्या उपस्थितीत मानवी तिरंग्यासाठी रांगेत उभे असताना विद्यार्थ्यांनी हवेत तिरंग्याचा आकारही काढला.

हेही वाचा: अग्निहोत्रीच्या टार्गेटवर ज्येष्ठ अभिनेते; २०-३० वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करतो अन्...

राष्ट्रध्वज फडकावणाऱ्या सर्वांत मोठ्या मानवी साखळीचा यापूर्वीचा जागतिक विक्रम अबुधाबीमध्ये जीईएमएस (GEMS) एज्युकेशनने केला होता. तो विक्रम चंदीगडमध्ये तुटला आहे, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर म्हणाले.

शेवटचा विक्रम कधी सेट झाला?

संयुक्त अरब अमिरातने २०१७ मध्ये ४,१३० लोकांसह मानवी राष्ट्रध्वजासह जागतिक विक्रम केला होता. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या यशस्वी विश्वविक्रमाच्या निर्मितीने जगाला मोठा संदेश दिला आहे. हा कार्यक्रम माझ्या कल्पनेपेक्षा मोठा झाला आहे. मी चंदिगड विद्यापीठाचे कुलपती आणि एनआयडी फाउंडेशनचे प्रधान संरक्षक एस सतनाम सिंग संधू यांचे अभिनंदन करतो. ज्यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Human Indian Flag World Record Students Cricket Stadium Chandigarh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..