Vivek Agnihotri : अग्निहोत्रीच्या टार्गेटवर ज्येष्ठ अभिनेते; २०-३० वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करतो अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri Latest News

अग्निहोत्रीच्या टार्गेटवर ज्येष्ठ अभिनेते; २०-३० वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करतो अन्...

Vivek Agnihotri Latest News आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप होताना दिसत आहे. या चित्रपटाला विविध कारणांमुळे विरोध होत आहे. चित्रपटगृहांमध्ये लोकांची संख्या खूपच कमी दिसत आहे. दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचे ट्विट चर्चेत आले आहे. ज्यामध्ये त्याने तरुण मुलींवर रोमान्स करणाऱ्या बॉलीवूड स्टार्सवर ताशेरे ओढले आहेत.

‘चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल तर विसरून जा. जेव्हा ६० वर्षांचा नायक २०-३० वर्षांच्या मुलींसोबत रोमान्स करतो. तरुण दिसण्यासाठी फोटोशॉपचा वापर केला जोता. तेव्हा बॉलिवूडमध्ये मूलभूतपणे काहीतरी चुकीचे आहे’, असे विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) शुक्रवारी ट्विटमध्ये लिहिले.

‘तरुण आणि कूल दिसण्याच्या सवयीने बॉलीवूडचा नाश केला आहे. या सगळ्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे’, असेही विवेक अग्निहोत्रीने ट्विटमध्ये लिहिले आहे. विवेक अग्निहोत्रीने त्या व्यक्तीचे नाव लिहिले नसले तरी ६० वर्षांचे अभिनेते २०-३० वर्षांच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करीत असल्याचा वाक्यावरून लोक अंदाज लावत आहेत.

हेही वाचा: आमिरकडे काम मागायला लाज वाटेल; ‘तारे जमीन पर’ फेम दर्शील सफारीचे भाष्य

अग्निहोत्रीचा राग कोणावर?

५७ वर्षीय अक्षय कुमारने ३३ वर्षीय भूमी पेडणेकरसोबत रक्षाबंधन चित्रपटात काम केले. त्याचवेळी ५३ वर्षीय आमिर खानचा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत विवेक अग्निहोत्री आमिर खान किंवा अक्षय कुमार (Akshay Kumar) यांना टार्गेट करतोय हे सांगणे कठीण आहे. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये बहुतांश लोक आमिर खानला (Aamir Khan) घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Web Title: Vivek Agnihotri Tweet Target Senior Actor Akshay Kumar Aamir Khan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..