कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढविणार

Dr Harshwardhan
Dr Harshwardhan

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज संसदेमध्ये सांगितले. सध्या ज्या दोन लशींच्या माध्यमातून लसीकरण केले जात आहे. त्याबाबत लोकांनी मनामध्ये कोणताही संभ्रम बाळगू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेमध्ये प्रश्‍नोत्तराच्या तासांमध्ये बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘आतापर्यंत देशातील साडेतीन ते चार कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या लशींचे दुष्परिणाम होण्याचे प्रमाण देखील ०.०००४३२ टक्के एवढे आहे. प्रत्येक लस सगळ्याच नागरिकांना देण्याची गरज नसते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आताही आम्ही ज्यांना लस देतो आहोत ते आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिक आहेत. येत्या काही दिवसांमध्ये लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्यात येईल पण त्यासाठी तज्ज्ञांची मते विचारात घेण्यात येतील.’’

सगळ्यांना सरसकट लस नाहीच
‘लसीकरणासाठी प्राधान्य गट निश्‍चित करताना आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांशी चर्चा केली आहे.’ असे आरोग्यमंत्री म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार सरसकट सगळ्यांना लस देण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्‍न विचारला होता. यावर आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘देशातील प्रत्येक व्यक्तीला लस देणे वैज्ञानिकदृष्ट्या गरजेचे नाही.’ दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या पाहणीमध्ये ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची फारशी झळ बसली नसल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेकांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

रुग्णसंख्येत विक्रमी वाढ
देशात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोरोनाचे सुमारे ४० हजार नवे रूग्ण आढळले असून यंदाच्या वर्षातील व मागील ११० दिवसांतील ही विक्रमी नवी रुग्णसंख्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. महाराष्ट्र व केरळबरोबरच दिल्लीतही नव्या रुग्णांची संख्या विक्रमी म्हणजे ५०० च्या वर गेल्याने केंद्रीय आरोग्य यंत्रणेने राज्य सरकारबरोबर तातडीच्या उपाययोजनांचा फेरआढावा घेतला आहे.

वाढता प्रभाव

  • कर्नाटक - मास्क न वापरल्यास अधिक दंड आकारणार
  • हरियाना - बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची शोध मोहीम युद्धपातळीवर
  • फ्रान्स - पॅरिससह १६ शहरात लॉकडाउन
  • ब्राझील - एका दिवसात २७२४ जणांचा मृत्यू
  • पाकिस्तान - अधिक संसर्ग असलेल्या भागांत लॉकडाउन

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com