...चिनी सैन्याने मानले भारताचे आभार

india china standoff indian army return one pla soldier from ladakh lac up
india china standoff indian army return one pla soldier from ladakh lac up

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील डेमचोक विभागात भरकटून भारतीय हद्दीत शिरलेला चिनी सैनिक भारताने त्यांच्या ताब्यात दिला. भारत आणि चीन यांच्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून तणाव कायम आहे. भारतीय लष्कराने चीनची विनंती मान्य केली असून, सीमेजवळ पकडलेल्या चिनी सैनिकाला सुखरूप मायदेशी पाठवले. चिनने भारताचे आभार मानले आहेत.

कॉर्पोरल वँग या लाँग यास चुशूल-मोल्डो सीमेवरील चौकीपाशी चिनी लष्कराच्या हवाली करण्यात आले. कॉर्पोरल हे सार्जंटपेक्षा दुय्यम दर्जाचे पद असते. याबाबत बीजिंगमध्ये चीनच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदन जारी केले. त्यानुसार हरवलेला याक शोधण्यासाठी रविवारी स्थानिक गुराख्यांना मदत करताना पीपल्स लिबरेशन आर्मीचा सैनिक भारत-चीन सीमेपाशी हरवला. त्याला बुधवारी पहाटे उभय देशांतील याबाबतच्या करारानुसार परत आमच्या हवाली करण्यात आले.

भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले की, पूर्व लद्दाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक जेव्हा ते एलएसीवर भटकताना आढळला तेव्हा त्याला पकडले होते. या सैनिकाला बुधवारी सकाळी सोडण्यात आले. चिनी सैन्याने या सकारात्मक वर्तनाबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत आणि अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत ते एक चांगले चिन्ह मानले आहे. भारतीय लष्कराने अटकेनंतर माणुसकीचे उदाहरणे दिले आहे. या चिनी सैनिकाला येथील वातावरणापासून वाचवण्यासाठी ऑक्सिजन, अन्न आणि उबदार वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे. प्रोटोकॉलनुसार, निर्धारित कार्यपद्धतीचे पालन केल्यानंतर, या सैनिकाला चिनी सैन्याकडे सोपवण्यास सांगितले गेले.

दरम्यान, गलवान खोऱ्यात हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे आणि चीन-भारत कमांडर स्तरावर आठपेक्षा जास्त वेळा बोलणी झाली आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील संघर्षानंतर प्रचंड फौजफाटा सीमेवर तैनात केला आहे. दोन्ही देशांनी पन्नास हजारहून जास्त सैनिक सज्ज ठेवले आहेत. मे महिन्याच्या प्रारंभी लष्करी संघर्ष झाल्यानंतर सुमारे पाच महिन्यांत संबंध तणावपूर्ण झाले आहेत. कमांडर पातळीवरील चर्चेची आणखी एक फेरी आयोजीत करण्यासाठी दोन्ही देश तयारी करीत आहेत. आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या असून 12 ऑक्टोबर रोजी सातवी फेरी पार पडली. त्यानंतरही लष्कर मागे घेण्याबाबत निर्णायक तोडगा निघू शकलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com