लसीकरणात भारत अमेरिकेच्या पुढे, मोदींकडून अभिनंदन; चीन अव्वल

Pm Modi
Pm ModiAFP
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविन अॅपची माहिती ज्या देशांना हवी आहे त्यांना विनामूल्य उपलब्ध करून द्या अशा सूचना दिल्याचेही आरएस शर्मा म्हणाले.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाविरोधात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. गेल्याच आठवड्यात एका दिवसात सर्वाधिक डोस देण्याचा विक्रम झाला होता. आता लसीकरणाच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकलं आहे. अमेरिकेनंतर एक महिन्याने लसीकरण मोहिम सुरु करूनसुद्धा भारताने हा टप्पा गाठला. फक्त अमेरिकाच नाही तर ब्रिटन, इटली, जर्मनी आणि फ्रान्स या देशांनासुद्धा भारताने मागे टाकलं आहे. आतापर्यंत देशात 32 कोटी 36 लाख डोस देण्यात आले आहेत. तर गेल्या 24 तासात देशात 17 लाख 21 हजार 268 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

जगात लसीकरणामध्ये चीन पहिल्या स्थानावर आहे. भारताने लसीकरणात गाठलेल्या माईलस्टोननंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, भारतातील लसीकरण मोहिम आता वेग घेत आहे. लसीकरणाच्या मोहिमेत जे काम करतायत त्या सर्वांचे अभिनंदन. सर्वांना मोफत लस देण्याला आपलं प्राधान्य असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.

भारतात कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. पाच महिन्यात 300 मिलियनपेक्षा जास्त नोंदणी आणि लसीकरण झाले. यामध्ये प्रत्येकाची वैयक्तीक नोंद करण्यात आली आहे. आपल्याकडे आधार आणि युपीआयच्या अनुभवातूनच कोविन सारख्या सिस्टिमसाठी कसं काम करायचं हे शिकायला मिळालं होतं. त्याचा फायदा झाल्याचं नॅशनल हेल्थ अथॉरिटी आणि कोविनचे सीईओ आरएस शर्मा यांनी सांगितले.

Pm Modi
राष्ट्रपतींनी सांगितला पगार; महिन्याला भरतात 2.75 लाख टॅक्स

कोविन अॅपसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी 50 हून अधिक देश उत्सुक आहेत. त्यात मध्य आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविन अॅपची माहिती ज्या देशांना हवी आहे त्यांना विनामूल्य उपलब्ध करून द्या अशा सूचना दिल्याचेही आरएस शर्मा म्हणाले.

आतापर्यंत भारतात 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अमेरिकेत लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत 32 कोटी 33 लाख 27 हजार 328 डोस देण्यात आले. विशेष म्हणजे अमेरिकेत 14 डिसेंबर 2020 पासून लसीकरण सुरु झाले तर भारतात त्यानंतर महिन्याभराने 16 जानेवारी 2021 ला पहिला डोस देण्यात आला होता.

Pm Modi
कोरोना लस घेतल्यावर पॅरालिसिस झाला बरा; रुग्णाचा दावा

भारताच्या तुलनेत चीनची आकडेवारी पाहिली तर इतर देशांपेक्षाही सर्वाधिक अशी आहे. 26 जूनपर्यंत चीनने 116 कोटींहून अधिक डोस दिले आहेत. त्यांचे एकूण डोस हे 1 हजार 165 मिलियन इतके झाले आहेत. तर भारताचे 323 मिलियन डोस झाले आहेत. देशात कोरोनाविरोधात लसीकऱण मोहिम वेग घेत असताना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com